आश्वी । झुंजार न्यूज

संगमनेर वंचित बहुजन आघाडीच्या प्रवक्तेपदी पक्षाच्या युवा नेत्या उत्कर्षा रुपवते यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी शनिवारी सहा प्रवक्त्यांची नियुक्ती केली. त्यामध्ये उत्कर्षा रूपवते यांचा समावेश आहे. या नियुक्तीबद्दल बोलताना उत्कर्षा रूपवते म्हणाल्या, प्रकाश आंबेडकर आणि पक्षाच्या प्रदेशाध्यक्षा रेखाताई ठाकूर यांनी जो विश्वास माझ्यावर दाखवला त्याबद्दल मी त्यांची ऋणी आहे. संविधानातील तत्त्वांशी बांधिलकी राखत वंचित बहुजन आघाडी पक्षाची ध्येय धोरणे प्रसार माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी करेल व पक्षाने माझ्यावर दाखवलेला विश्वास सार्थ ठरवेल, असे त्यांनी सांगितले.
त्याच्या निवडीबद्दल सर्व स्तरावरुन अभिनंदन होत आहे .
राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *