आश्वी | झुंजार न्यूज
संगमनेर तालुक्यातील डिग्रस येथे कृषी विभाग व अटल भुजल विभागामार्फत कृषी संजीवनी सप्ताहानिमित्त शेतकरी मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यात तालुका कृषी अधिकारी प्रवीण गोसावी यांनी शेतकऱ्यांना प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेची माहिती दिली.

कृषी संजीवनी सप्ताह शेतकरी मेळाव्यात साकुरचे मंडळ कृषी अधिकारी कोते यांनी शेतकऱ्यांना बियाणे, कृषी व कृषी निविष्ठा कृषी सेवा केंद्रातून घेत असताना घ्यावयाची काळजी तसेच शेतकऱ्याकडे असणारे घरगुती बियाणेची काळजी कशी घ्यावी, याबाबत मार्गदर्शन केले. कृषी विभागाच्या महाडीबीटी पोर्टलवरील सर्व योजनांची माहिती कृषी पर्यवेक्षक पोखरकर यांनी दिली. तसेच अटल भूजल योजनांची माहिती राजेंद्र शिंदे यांनी दिली. कृषी सहाय्यक लक्ष्मण जुंधारे यांनी कृषी संजीवनी सप्ताहाच्या दुसऱ्या दिवशी बाजरी बीज प्रक्रिया प्रात्यक्षिक करून दाखवले. यावेळी सरपंच अशोक खेमनर, उपसरपंच रंगनाथ बिडगर, विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे चेअरमन दामोदर नान्नर, प्रगतशील शेतकरी गिरजु खेमनर, ग्रामसेवक कहाने, भूजल सर्वेक्षणचे बिडगर, ग्रामपंचायत सदस्य नामदेव होडगर, चंद्रगिरी कृषी सेवा केंद्राचे चालक बाळासाहेब खेमनर, कृषी सहाय्यक योगेश तळपे, योगेश मेमाणे, संकेत पाडळे, अशोक रंधे उपस्थित होते.

या मेळाव्यात प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना, सोयाबीन, बाजरी, कापूस, मका पिकांबाबतची बीज प्रक्रिया या विषयी मार्गदर्शन केले गेले. ठिबक सिंचन, तुषार सिंचन, मल्चिंग पेपर, शेडनेट, पॉलीहाऊस बाबदही मार्गदर्शन करण्याबरोबरच प्रत्यक्ष ऑनलाईन अर्ज करण्यासाठी व्यवस्था केली होती.
