{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{"addons":1},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":true,"containsFTESticker":false}

संगमनेर । झुंजार न्यूज

 

 

 अमृतवाहिनी मॉडेल स्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये इयत्ता ११ वी करता नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ मोठ्या उत्साहात साजरा झाला असल्याची माहिती प्राचार्या श्रीमती गायकवाड यांनी दिली आहे.
बुधवार दिनांक ०३ जुलै २०२४ रोजी अमृतवाहिनी द्रोणागिरी हॉल येथे आयोजित करण्यात आला. यानिमित्ताने अमृतवाहिनी मॉडेल स्कूल व ज्युनियर कॉलेजच्या प्राचार्या श्रीमती गायकवाड एस. डी. मॅडम यांनी विद्यार्थ्यांनी आयुष्यात यश मिळवण्यासाठी परिश्रम व सातत्यपूर्ण अभ्यासाशिवाय विद्यार्थीना पर्याय असून शकत नाही. सातत्यपूर्ण अभ्यास ही यशस्वी होण्याची गुरुकिल्ली आहे असे प्रतिपादन केले.

याप्रसंगी इयत्ता १२ वी सायन्सच्या विद्यार्थ्यांची मनोगते झाली. ज्युनियर कॉलेज विभागाचे विभाग प्रमुख  कर्पे सर यांनी विद्यार्थ्यांसाठी कॉलेजच्या नवनवीन उपक्रमाबद्दल माहिती दिली. विद्यार्थ्यांनसाठी आयुष्यातील प्रत्येक दिवस हा आपल्याला एक नवीन संधी उपलब्ध करून देत असतो. त्या संधीचे सोने करा , आपल्या स्वप्नांना साकार करा. अमृतवाहिनी मॉडेल स्कूल च्या प्राथमिक विभागाच्या विभाग प्रमुख श्रीमती हजारे मॅडम यांनी विद्यार्थ्यांना यशस्वी व्हायचे असेल तर स्वतःला सतत विकसित करत राहावे लागेल. शिक्षण आणि आत्मविश्वास हे यशाच्या मार्गावरील दोन महत्त्वाचे स्तंभ आहेत. असे प्रतिपादन केले.

याप्रसंगी अमृतवाहिनी मॉडेल स्कूल व ज्युनिअर कॉलेज विभागातील सर्व विभाग प्रमुख, सर्व शिक्षक व शिक्षकेतर सेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्थेचे अध्यक्ष व महाराष्ट्र राज्याचे माजी महसूलमंत्री आमदार बाळासाहेब थोरात, संस्थेचे विश्वस्त आमदार डॉ. सुधीर तांबे, उपाध्यक्ष बाळासाहेब गुंजाळ पाटील, नगराध्यक्षा सौ. दुर्गाताई तांबे, संस्थेच्या विश्वस्त सौ. शरयूताई देशमुख, संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी  अनिल शिंदे,  गुरव सर डायरेक्टर अकॅडेमिक व्यवस्थापक, प्राचार्य व्ही. बी. धुमाळ, प्राचार्या सौ. शितल गायकवाड व सर्व मान्यवरांनी इयत्ता ११ वी करता नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना यशस्वी होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *