संगमनेर | झुंजार न्यूज

 

अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्था संचलित अमृतवाहिनी इन्स्टटियूट ऑफ फार्मसी  महाविद्यालयातील पदविका  अभ्यास क्रमाच्या  म.रा.तं.शि मंडळाने घेतलेलया वार्षिक परिक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला.

सदर परिक्षेत महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादीत केल्याची माहिती महाविद्यालयाचे  प्राचार्य डॉ.एम.पी.शिरभाते यांनी दिली.

प्रथम वर्ष डी.फार्मसी मधील कु.तांबोळी नमरा जावेद ८५.५० %, कु.साबळे मयुरी नवनाथ ८०.६०, कु.वाकचौरे रिद्धी योगेश ७६.८० %गुण मिळवूण हया विद्यार्थ्यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविला आहे. द्वितीय वर्ष डी. फार्मसीमधील कु.जपे सायली संतोष ८६.४६%,कु.फड प्रणिता सुभाष ८५.९१%,कु. परदेशी अदिती  कैलाससिंग ८५.१८ % गुण मिळवूण हे विद्यार्थी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण आहेत. विशेष प्राविण्य श्रेणीतून ७१ विद्यार्थ्यी उत्तीर्ण झालेले आहेत.

 

अमृतवाहिनी इन्स्टटियूट ऑफ फार्मसी महाविद्यालय हे विद्यार्थ्यासाठी सर्व सोयीयुक्त महाविद्यालय असून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परषिदेचे देखील आयोजन केले जाते. अमृतवाहिनी इन्स्टटियूट ऑफ फार्मसी व मलेशिया येथील सायबरजिया विद्यापीठ यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्यात आला असून त्यामार्फत मलेशियातील विद्यार्थ्यांना अमृतवाहिनीत व अमृतवाहिनीच्या विद्यार्थ्यांना व देशात संशोधनाच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत.विद्यार्थी  व प्राध्यापक यांना मलेशियातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन लाभत असून संशोधन दौऱ्याचे देखील आयोजन करण्यात येणार आहे.विद्यार्थ्यानां प्रशस्त इमारती सोबतच सुसज्ज लेब्रोरेटरी,ग्रंथालय, इंटरनेट, मुलामुलींसाठी स्वतंत्र होस्टेल अशा अदययावत सुविधा पुरविलया जातात.विद्यार्थ्यांच्या सर्वागिणविकासासाठी व्यक्तिमत्व विकास शिबीर,रक्तदानशिबीर,वृक्षारेापण असे विविध उपक्रम महाविद्यालयात राबविले जातात.व्यक्तिमत्व विकासासोबतच विद्यार्थ्यांनी सामाजिक बंधिलकी म्हणुन वेगवेगळया ठिकाणीविविध आजार,त्यावरिल उपचार व मेडिसिनस याबद्दल जनजागृती रेलीचे आयोजन केले जाते.डी फार्मसी महाविद्यालय हे वेगवेगळया कंपन्याशी व हॉस्पीटल सोबतसंलग्नीत असून त्यामार्फत विद्यार्थ्यानां दरवर्षी वेगवेगळया कंपन्यांचे केंम्पस इंटरव्युह आयोजीत केले जातात व विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळया विषयांवर गेस्ट लेक्चर्सचेवेळेावेळी आयोजन केले जाते. सर्व उपक्रमांची व महाविद्यालयाच्या कामगीरीची दखलघेत महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ मुंबई यांच्याकडून वेळेवेळी अहमदनगर जिलहयातील “सर्वोउत्कृष्ट पदविका औषधनिर्माणशस्त्र महाविद्यालय” दर्जा प्राप्त झालेला आहे.

 


                 

संस्थेचे अध्यक्ष व महाराष्ट्र राज्याचे मा.महसूलमंत्री आ.बाळासाहेब थोरात, संस्थेचे वश्विस्त मा.आ.डॉ.सुधीर तांबे,कारखान्याचे संचालक इंद्रजतिभाऊ थोरात, सौ.शरयुताई देशमुख, मुख्य कार्यकारी अधकिारी अनिल शिंदे,संस्थेचे अकॅडेमकि डायरेक्टर डॉ.जे.बी गुरव, प्राचार्य डॉ.एम पी.शिरभाते यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभनिंदन केले असून त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *