संगमनेर । झुंजार न्यूज  

बारावी सायन्सचा निकाल, एच.एच.टी.सी.ई.टी. व जेईई परिक्षेचा निकाल लागलेला असून पालक व विद्यार्थ्यांची प्रतिक्षा प्रथम वर्ष अभियांत्रिकीच्या प्रवेशासाठी नुकतीच संपली आहे़.  तंत्रशिक्षण संचालनालयाने सर्व व्यावसायिक पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम यांचे वेळापत्रक जाहिर केल असून 14 जुले, 2024 पासून प्रथम वर्ष अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रीया सुरु होणार आहे़  याकरिता यापूर्वीच महाविद्यालयाने  प्रथम वर्ष प्रवेश मार्गदर्शन केंद्र सुरु केले असल्याची माहिती  प्राचार्य डॉ़ एम़ ए़ व्यंकटेश यांनी दिली आहे.

 

याविषयी माहिती देताना ते म्हणाले कि,   आत्तापर्यंत एक हजाराच्या वर विद्यार्थ्यांनी या प्रवेश प्रक्रीया केंद्रास प्रत्यक्ष भेट देऊन प्राध्यापकांकडून समुपदेशनाव्दारे विद्यार्थी व पालकांच्या शंकांचे समाधान करण्यात आले आहे़. महाविद्यालयाने सोशल मिडीयाव्दारे सर्व महत्वाचे संदेश पालकांपर्यंत पोहचवण्यासाठी यशस्वी यंत्रणा राबवली आहे़ . प्रवेश प्रक्रीया जाहिर झाल्यानंतर विद्यार्थी व पालक यांनी सर्व प्रक्रीया अगदी सुरळीतपणे व विनाशंका पुर्ण करावी. सर्व विभागांतील 716 प्लेसमेंट्स, उच्चविद्याविभूषीत व अनुभवी प्राध्यापक, चाळीस वर्षांची उत्कृष्ठ शैक्षणिक संस्कृती यामुळे विद्यार्थी व पालक दरवर्षी अमृतवाहिनी अभियांत्रिकीस पसंती देत आहेत़ 
महाविद्यालयातील जपानी व जर्मन भाषा केंद्राने विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर संधी उपलब्ध होत आहेत़  प्रकल्प स्पर्धा, प्रकल्पावर आधारित शिक्षण यामुळे विद्यार्थ्यांचे कौशल्य विकसीत होऊन प्लेसमेंट मिळण्यास मदत होत आहे़ . सहकार महर्षी स्व.भाऊसाहेब थोरात यांनी 1983 साली सुरु केलेल्या महाविद्यालयाने संगमनेरच्या शैक्षणिक प्रगतीमध्ये महत्वाची भुमिका बजावली आहे़  संस्थेचे अध्यक्ष माजी शिक्षणमंत्री आमदार बाळासाहेब थोरात व विश्‍वस्त डॉ़ सुधीरजी ताबे यांच्या मार्गदर्शनाने गुणवत्तापूर्ण शिक्षण विद्यार्थ्यांना मिळत असल्याचे समाधान असल्याचेही ते म्हणाले. 
तरी अधिक माहितीसाठी महाविद्यालयाचे रजिस्ट्रार प्रा़ व्ही़ पी़ वाघे, प्रथम वर्ष प्रवेश समन्वयक डॉ़ व्ही़ जे़ हासे आणि सर्व विभाग प्रमुख यांचेशी संपर्क करावा़  
मार्गदर्शन केंद्र विद्यार्थ्यांच्या प्रवेशाबाबतच्या शंकांचे निरसन करणारे – सौ.शरयुताई देशमुख
महाविद्यालयातील अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रीया तसेच करिअर मार्गदर्शनासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर वृंद आपला वेळ देत असून यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दरवर्षी मदत होत असते़ . यावर्षी मुलींचे व्यावयायीक शिक्षण हे मोफत झाले असून यामुळे मुलींचा ओढा व्यावसायीक शिक्षणाकडे वाढत आहे़.  सर्व मुलींनी याचा लाभ घ्यावा” असे आवाहन अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्थेच्या व्यवस्थापकीय विश्‍वस्त सौ.शरयुताई देशमुख आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे यांच्या वतीने करण्यात येत आहे.  
राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *