{"remix_data":[],"source_tags":[],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":false,"containsFTESticker":false}

मोफत बालरोगतज्ञांचा सल्ला व मार्गदर्शन



संगमनेर । झुंजार न्यूज

 

आपल्या शुद्ध आयुर्वेद उपचारपद्धतीसाठी महाराष्ट्रात नावाजलेल्या आणि उत्तर महाराष्ट्रातील सर्वांत अद्यायावत असलेल्या एसएमबीटी आयुर्वेद हॉस्पिटतर्फे बालकांसाठी मोफत सुवर्णप्राशन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबीर या महिन्यात येत्या ८ जुलै रोजी होणार असून सकाळी ९ ते दुपारी ३.३० वाजेपर्यंत बालकांना सुवर्णप्राशन संस्कार केले जाणार आहेत. जास्तीत जास्त नागरिकांनी त्यांच्या बालकांना मोफत सुवर्णप्राशन करण्यासाठी भेट द्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.

 

 

सिन्नर-घोटी रस्त्यावर धामणगाव येथे एसएमबीटी सेवाभावी संस्थेचे एसएमबीटी आयुर्वेद रुग्णालय आहे. उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या क्षमतेचे आणि तज्ज्ञ चिकित्सक असलेल्या एसएमबीटी आयुर्वेद रुग्णालयाकडून मोफत सुवर्णप्राशन व विशेष आयुर्वेद चिकित्सा शिबिर आयोजित केले आहे.  सुवर्ण प्राशन हे लहान मुलांच्या शारीरिक विकासासाठी आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी उपयुक्त असते.

हा संस्कार वय वर्ष ० ते १२ वयोगटातील मुलांना प्रत्येक महिन्याच्या पुष्य नक्षत्रात देण्यात येतो. या औषधामध्ये सोने, मध, तूप आणि औषधी वनस्पती यांचे मिश्रण असते . या शिबिरात बालकांना मोफत सुवर्णप्राशन केले जाईल. शिबिर कालावधीत बालकांची आयुर्वेद तपासणी व उपचार पुर्णत: मोफत केले जाणार आहेत.

यासोबतच लहान मुलांचे आजार,  जन्मजात आजार असलेल्या बालकांची तपासणीदेखील याप्रसंगी केली जाणार असून बालकांना अधिक उपचारसाठी मार्गदर्शन केले जाणार आहे. मोफत सुवर्णप्राशन संस्कार करण्यासाठी एसएमबीटी आयुर्वेद हॉस्पिटल धामणगाव, एसएमबीटी क्लिनिक नाशिक, एकदरे येथील एसएमबीटीचे ग्रामीण आरोग्य केंद्र व एसएमबीटी दंत रुग्णालय संगमनेर भेट द्यावी किंवा  9145001659 क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन रुग्णालयाकडून करण्यात आले आहे.

सुवर्णप्राशनाचे फायदे

* बाळाची शारीरिक व बौद्धिक क्षमता वाढते.
* पचन क्षमता वाढते.
* आकलन क्षमता वाढते.
* सर्दी, बालदमा, खोकला इ. विरुद्ध क्षमता वाढते.
* स्मरणशक्ती वाढते.
* रोगप्रतिकार क्षमता वाढते

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *