{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{"addons":1},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":true,"containsFTESticker":false}

पुढील तीन महिने घेता येणार शिबिराचा लाभ

हृदय विकार, कॅन्सर, मूत्रविकार, मेंदू व मनकेविकार शस्रक्रिया पूर्णपणे मोफत

 

तीन दिवस औषधोपचारांसह बाह्यरुग्ण तपासणी पूर्णपणे मोफत

 

शासकीय योजनेत न बसणाऱ्या शस्रक्रिया अल्पदरात उपलब्ध

नाशिक । झुंजार न्यूज

सर्वसामान्यांना दर्जेदार उपचार मिळावेत या हेतूने सुरु करण्यात आलेल्या आरोग्यसाधना शिबिरास आजपासून सुरुवात झाली आहे. गेल्या आठ वर्षांच्या अभूतपूर्व प्रतिसाद या शिबिरास मिळत आहे.  आज (दि १) माजी विधानपरिषद सदस्य डॉ सुधीर तांबे यांच्या हस्ते या शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. या शिबिरात बाह्यरुग्ण तपासणी, सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया, हृदय उपचार यासोबतच खुबा व गुडघा प्रत्यारोपण, सिझेरियन व नॉर्मल प्रसूती पूर्णत: मोफत करण्यात आली आहे. यासोबतच तीन दिवस औषधोपचारांसह बाह्यरुग्ण तपासणीदेखील पूर्णपणे मोफत केली जाणार आहे. एसएमबीटीचे आरोग्यसाधना शिबीर महाराष्ट्रातील सर्वात मोठे आरोग्यशिबीर असून सलग तीन महिने रुग्णांवर मोफत व अल्पदरांत उपचार केले जाणार आहेत.

इगतपुरी तालुक्यातील सिन्नर-घोटी रस्त्यावर असलेल्या ‘एसएमबीटी हॉस्पिटल’मध्ये विविध आरोग्यउपचार मोफत केले जात आहेत. महाराष्ट्रातील सर्वोत्तम आरोग्यसेवा पुरविणारे हॉस्पिटल म्हणून ‘एसएमबीटी’चा लौकीक आहे. गेल्या वर्षी आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य साधना आरोग्यशिबिरात तीन लाखांपेक्षा अधिक रुग्णांवर उपचार करण्यात आले. .

एसएमबीटी हॉस्पिटलमध्ये यंदा कर्करोग, मेंदूसंबंधित आजार, मनकेविकार, पोटविकार, दुर्बिणीद्वारे शस्रक्रिया, मूत्ररोग, अस्थिरोग, कान-नाक-घसा, जनरल सर्जरी यासोबतच हृदयविकारांवर मोफत शस्रक्रिया केल्या जात आहेत. विशेष म्हणजे सिझेरियन प्रसूती, नॉर्मल प्रसूती यासह व्हेरीकोस व्हेन्स शस्रक्रिया, मोतीबिंदू शस्रक्रिया, तिरळेपणा शस्रक्रिया, संततीची शस्रक्रिया तसेच गरोदर मातांशी सलंग्नीत सोनोग्राफी व रक्त तपासण्या पूर्णपणे मोफत करण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे, यंदाच्या शिबिरात यकृत आणि मूत्रपिंड प्रत्यारोपणदेखील होणार आहे.

९१० हजार बेडची क्षमता असलेल्या या हॉस्पिटलमध्ये शेकडो अनुभवी डॉक्टर्स पूर्णवेळ सेवा बजावत आहेत. शिवाय प्रत्येक विभागासाठी स्वतंत्र ओपीडी, अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज असलेले १७ मॉड्यूलर ऑपरेशन थियेटर्स, 24 तास उपलब्ध असणारा अतिदक्षता अपघात विभाग आणि स्वच्छ व विस्तीर्ण हॉस्पिटलचा परिसर यामुळे महाराष्ट्रातील महत्वाचे आरोग्य उपचार केंद्र म्हणून एसएमबीटीचा लौकिक सर्वदूर पोहोचला आहे.

एसएमबीटी हॉस्पिटलमध्ये प्रत्येक आजारावरील पूर्नवेळ तज्ज्ञ डॉक्टर्स उपलब्ध आहेत. शिबीर कालावधीत हृदयरोग, कॅन्सर, मुत्रपिंडविकार, पोटविकार, मधुमेह-उच्च रक्तदाब, स्त्रीरोग, लहान मुलांचे आजार, अस्थिरोग, टी.बी.चेस्ट, कान नाक घसा, त्वचारोग, दंतरोग, मेंदूविकार, नेत्ररोग, मानसिक आजार, किडनीसंदर्भातील समस्या तसेच जनरल मेडिसीन वर्गातील कावीळ, हृदय, पोटाचे विकार आदी समस्यांबाबत मोफत तपासणी करून योग्य ते उपचार व मार्गदर्शनही मोफत मिळणार आहे. शिबीराच्या कालावधीत औषधे, रक्त लघवी तपासणी, एक्सरे-सोनोग्राफी तसेच इतर ज्या शस्रक्रिया शासकीय योजनेत बसत नाहीत अशा सर्वच प्रकारच्या शस्त्रक्रिया अल्पदरात होणार आहेत.

एसएमबीटी हॉस्पिटल संलग्नीत एसएमबीटी हार्ट इन्स्टिट्यूटमध्येही शिबीर कालावधीत सर्वच हृदयउपचार शासकीय योजनेच्या माध्यमातून मोफत होणार आहेत. यामध्ये हृदयविकार ग्रस्त रुग्णांची अ‍ॅन्जिओग्राफी, अ‍ॅन्जिओप्लास्टी, बायपास, वॉव्ह बदलणे व दुरुस्त करणे, लहान मुलांची ओपन हार्ट सर्जरी, बलून, पेसमेकर इम्प्लांट, जन्मजात हृदयविकार, ई-पी स्टडी, आदी महत्वाच्या शस्त्रक्रिया या विभागात पूर्णत: मोफत होत आहेत. यासाठी निष्णात कार्डिओलॉजिस्ट आणि कार्डिओसर्जनची पूर्णवेळ टीम येथे कार्यरत आहेत. हा हृदयरोग विभाग आजमितीला उत्तर महाराष्ट्रातील सर्वांत अत्याधुनिक विभाग मानला जातो. अत्याधुनिक कॅथलॅब कार्यन्वित असून येथील प्रत्येक सामग्री ही अत्याधुनिक प्रकारची आहे. त्यामुळे हृदयरुग्णांवरचे उपचार दर्जेदार आणि सुरक्षित होतात.

आरोग्यसाधनेच्या माध्यमातून रुग्णसेवा

आजपासून सुरु करण्यात आलेले आरोग्यसाधना शिबीराचा जास्तीत जास्त रुग्णांनी लाभ घ्यावा. गेल्या आठ वर्षांपासून या शिबिराचे आयोजन केले जाते आहे. सर्वसामान्यांना दर्जेदार उपचार तेही मोफत तसेच परवडणाऱ्या दरांत उपलब्ध व्हावेत हा हेतू यामाध्यमातून साकार होताना आनंद होत आहे. पहिल्याच दिवशी आरोग्यसाधना मदतकेंद्रात रुग्णांची गर्दी पाहता हे शिबीर किती महत्वाचे होते याचा अंदाज लावता येईल.
डॉ सुधीर तांबे, माजी. विधानपरिषद सदस्य

समृद्धी महामार्ग सोयीस्कर

समृद्धी महामार्ग सुरु झाल्यामुळे व त्यावरील एसएमबीटी इंटरचेंज अगदी जवळ असल्यामुळे वैजापूर,  बुलढाणा, औरंगाबाद, अमरावती, बीड, जालना, अकोलासह परिसरातील रुग्णांना एसएमबीटी हॉस्पिटलपर्यंत येणे सोपे आणि सोयीस्कर झाले आहे.

एसएमबीटी केअर प्लस

राज्याच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या रुग्णांच्या सोयीसाठी एसएमबीटी हॉस्पिटलकडून विशेष सोय करण्यात आली आहे. अतिशय नाममात्र दरात स्पेशल रूम याठिकाणी रुग्णांसाठी साकारण्यात आलेले आहेत. एक रुग्ण, दोन रुग्णांसाठी किंवा तीन रुग्णांसाठी याठिकाणी विशेष रूम उपलब्ध करून देण्यात आले आहे.

मोफत सुपरस्पेशालिटी व स्पेशालिटी शस्रक्रिया

कर्करोग/कॅन्सर शस्रक्रिया
मेंदूच्या शस्रक्रिया
मनकेविकार शस्रक्रिया
दुर्बिणीद्वारे/लॅप्रोस्कोपिक शस्रक्रिया
पोटातील क्लिष्ट शस्रक्रिया व स्कोपी
मूत्ररोगाशी संबंधित शस्रक्रिया
अस्थिरोग शस्रक्रिया
यकृत व मूत्रपिंड प्रत्यारोपण

हॉस्पिटलची वैशिष्ट्ये

९१० बेडचा आंतररुग्ण विभाग
२०० आयसीयु बेड
१७ मोड्युलर ऑपरेशन थियेटर्स
अत्याधुनिक कॅथलॅब
सुसज्ज एसएमबीटी केअर प्लस विभाग
बोन मॅरो ट्रान्सप्लांट युनिट
कार-टी सेल थेरपी
२४ तास औषधालय,
रुग्णवाहिका सुविधा व डायलिसिस सुविधा 
राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *