आश्वी | झुंजार न्यूज
संगमनेर तालुक्यातील पूर्व भागातील व शिर्डी विधानसभा मतदारसंघातील खळी येथील तसेचं आंबेडकर चळवळीची कणखर नेतृत्व व खंडोबा देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष किशोर वाघमारे यांची शिवसेना पक्षाच्या अनुसूचित जाती विभागाच्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती केल्याची घोषणा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अनुसूचित जाती विभाग डॉ राजू वाघमारे यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशान्वये मुंबई येथील नरिमन पॉईंट मंत्रालय समोरील स्व . बाळासाहेब ठाकरे भवन येथे करण्यात आली .
यावेळी पक्षप्रमुख तथा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पक्षाची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली सदर बैठकीमध्ये महाराष्ट्र राज्यांमधील बहुतांश जिल्ह्यामध्ये पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त करण्यात आल्या .आगामी होणाऱ्या विधानसभा निवडणुका असल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा महत्त्वाच्या निर्णय घेतला . यामध्ये अहमदनगर जिल्ह्यातील आंबेडकर चळवळीचे किशोर वाघमारे यांची अनुसूचित जाती सेलच्या जिल्हाध्यक्ष पदी निवड केली
किशोर वाघमारे हे गेल्या वीस वर्षांपासून आंबेडकर चळवळीमध्ये काम करत आहे रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमातून विविध पदावर काम केलेले असून अनुसूचित जाती विभागामध्ये एक अनुभवी कार्यकर्ता म्हणून किशोर वाघमारे हे असल्याचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष डॉ राजू वाघमारे यांनी सांगितले तर वाघमारे यांचा अहमदनगर जिल्ह्यातील सर्व तालुक्यामध्ये दांडगा जनसंपर्क असून त्यांनी या अगोदर अनुसूचित जाती च्या विविध प्रश्नावर आंदोलने मोर्चे काढले. ते उच्चशिक्षित असून त्यांच्या गावातील एका देवस्थानचे ते अध्यक्ष आहे .

चौकट
स्व बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराचा शिवसेना पक्ष हा तळागाळापर्यंत पोहचवून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राबविलेल्या विविध योजना लोकांपर्यंत पोहचविणार तसेचं नव्याने सुरु केलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेचा प्रत्येक गोर गरिब कुटुबाला लाभ मिळवून देणार !
किशोर वाघमारे ( जिल्हाध्यक्ष : अनुसूचित जाती सेल ( शिंदे सेना ) नगर



