सरपंच सेवा संघाच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री व ग्रामविकास मंत्र्यांची घेतली विधानभवनात भेट

मुंबई । झुंजार न्यूज 

 

संपूर्ण राज्यातील सरपंच उपसरपंच सदस्यांनी आपल्या विविध मागण्याकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आझाद मैदा नावर आंदोलन केले या आंदोलनाची राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी दखल घेतली असून मागण्या सोडविण्याबाबत लवकरा लवकर निर्णय करू असे आश्वासन मुख्य मंत्री एकनाथ शिंदे यांनी सरपंच सेवासंघा च्या शिष्टमंडळाला विधानभवनात झालेल्या बैठकीतील दिले .

 

 

संपूर्ण राज्यातील सरपंच उपसरपंच ह राज्य शासनाच्या वेगवेगळ्या योजना सर्व सामान्य माणसापर्यंत पोहचविण्यासाठी सरपंच उपसरपंच अहोरात्र मेहनत करून आम जनतेला दिलासा देण्यासाठी सतत प्रयत्न करत असतात अशा यासरपंचांच्या मानधनात दुप्पट वाढ करावी , सरपंच पदाच्या कार्यकाळात दहा लाखाचे विमा संरक्षण देण्यात यावे, सरपंच ग्रामसेवक यांची संयुक्त मासिक बैठक आयोजित करण्यात यावी ,सरपंचावर हल्ला करणा ऱ्याना विशेष संरक्षण कायदा लागूकरावा राज्यातील आजी माजी सरपंचउपसरपंच यांचे थकीत मानधन तत्काळ वर्ग करावे आधी मागण्यासाठी स्वराज्य सरपंच सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष बाबासाहेब पावसे यांच्या नेतृत्वाखाली अनेक दिवसां पासून सरकारकडे पाठपुरावा सुरू होता. या मागण्यासाठी अनेक आंदोलने सुद्धा करण्यात आली होती. परंतू सरकारने दखल घेतली नाही त्यामुळे आम्हाला नाई लाजास्तव मुंबईच्या आझाद मैदानावरती आंदोलन करण्याची दुर्दैवी वेळ आमच्या वर आली असल्याचे सरपंच सेवा संघाचे संस्थापक सरपंच संघटीत चळवळीचे नेतृत्व बाबासाहेब पावसे आदर्श सरपंच अशोक ओहळ विजय पाटील अविनाश पवार नंदकुमार कदम अरूण खरमाटे डॉ तान्हाजीपाटील सौ पुजा जाधव जानु गायकर लता खोत संजय काळे बाबाजी गुळवे निलेशपावसे सोमनाथ नाडे रोहित पवार अमोलशेवाळे रविंद्र पवार सुरेश गडाख यांनी राज्य सरकारला दिला आहे
या वेळी आंदोलनकर्त्यांनी दिलेल्या घोष णांनी आझाद मैदानाचा परिसर दणाणून सोडला होता.

 

 

सरपंचांच्या आंदोलनाची राज्याचे ग्राम विकास मंत्री गिरीश महाजन यांनी दखल घेत सरपंचाच्या मागण्याबाबत राज्य सर कार सकारात्मक असल्याचे मंत्री महाजन यांनी सरपंचांच्या शिष्टमंडळाला सांगितले त्यानंतर या शिष्टमंडळाने विधान भवनात जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत सरपंचाच्या मागण्यासोडविण्याबाबत त्यांना साकडे घातले. त्यांनी सुद्धा सरपंच उपसरपंच व सदस्यांच्या मागण्या मान्य करण्याबाबत सकारात्मकता दर्शवली त्यानंतर या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत त्यांनाही आपले म्हणणे मांडले त्यांनीही लवकरात लवकर तुमच्या मागण्या सोडवण्यासाठी निर्णय घेऊ असे आश्वासन दिले

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *