डॉ. जयश्रीताई थोरात यांच्या पुढाकारातून महिला उद्योजकतेला बळ


संगमनेर | झुंजार न्यूज 

एकविरा फाउंडेशनचे अध्यक्ष कॅन्सरतज्ञ डॉ जयश्रीताई थोरात यांनी महिला सबलीकरण व उद्योजकतेसाठी सातत्याने विविध उपक्रम राबवले असून एकविराच्या शिवण क्लासमुळे अनेक महिला भगिनींना घरगुती गृह उद्योगासाठी बळ मिळाले असल्याचे प्रतिपादन प्रशिक्षक सौ शिला करंजेकर यांनी केले आहे.

यशोधन कार्यालय येथे एकविरा फाउंडेशन च्या वतीने सुरू असलेल्या मोफत शिवण क्लास बाबत माहिती देताना त्या बोलत होत्या यावेळी समवेत प्रशिक्षक सुजाता बोबडे, सौ सुनीता कांदळकर, सौ कविता पानसरे, सौ.रूपाली सोनवणे ,सौ कल्पना दिघे आदींसह महिला उपस्थित होत्या.

यावेळी बोलताना सौ. करंजेकर म्हणाल्या की, काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुक्यातील महिला सबलीकरण व आर्थिक समृद्धीसाठी सातत्याने विविध उपक्रम राबवले आहेत. बचत गटाचे मोठे जाळे असून या महिलांना उद्योग व्यवसायासाठी मार्गदर्शन केले जात आहे. याचबरोबर ग्रामीण व शहरी भागातील अनेक महिलांना एकविरा फाउंडेशनच्या माध्यमातून शिवण क्लास मधून मोफत प्रशिक्षण दिले जात असून यामुळे अनेक महिलांना गृह उद्योगासाठी बळ मिळणार आहे.

डॉ जयश्रीताई थोरात यांच्या पुढाकारातून हा एक अभिनव व स्तुत्य उपक्रम असून यामध्ये महिलांनी अत्यंत हिरीरीने सहभाग घेतला असल्याचेही त्या म्हणाल्या.

तर सौ बोबडे म्हणाल्या की, कमी वेळेत उच्चतम दर्जाचे प्रशिक्षण देऊन महिलांना अधिक प्रशिक्षक बनवण्यासाठी या सेमिनार मधून काम केले जात आहे.

या प्रशिक्षण क्लास मधून बेसिक व ॲडव्हान्स शिवण क्लास चे ट्रेनिंग दिले जात आहे 120 महिला हे प्रशिक्षण घेत असून पुढील महिन्यातही 120 महिलांना प्रशिक्षण दिले जाणार आहे.

यावेळी सौ कविता पानसरे यांनी प्रास्ताविक केले तर सौ सुनीता कांदळकर यांनी आभार मानले

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *