आश्वी | झुंजार न्यूज

“गुरूविण न मिळे ज्ञान, ज्ञानाविण नसे जगी सन्मान” या उक्तीप्रमाणे संगमनेर तालुक्यातील पानोडी , आश्वी येथील बालपण इग्लीश स्कूल मध्ये अतिशय उत्साही वातावरणात विद्यार्थी दशेतील शिष्यांनी आपल्या गुरूंचे म्हणजेच शिक्षकांचे दर्शन घेत त्यांच्या पदस्पर्श फुले समर्पित करत गुरुपौर्णिमा उत्सव साजरा करण्यात आला.
बालपण शाळेतील पूर्व प्राथमिक केजी ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी आपल्या गुरु विषयी म्हणजेच शिक्षकांविषयी भावना व्यक्त करत गुरुंचे महत्व विशद केले.  बालपणच्या विद्यार्थ्यांनी आपल्या गुरूंना भेटवस्तू व पुष्पगुच्छ देत त्यांचे आशीर्वाद घेत एक आनंददायी वातावरणात गुरुपौर्णिमा हा सण साजरा करण्यात आला बालपणच्या जुनिअर कॉलेजच्या विद्यार्थिनींनी शाळेच्या आवारात रांगोळी काढत रांगोळीतून आपल्या गुरु विषयीच्या भावना प्रकट करत व गुरु पौर्णिमेच्या संदेशाचा फलक लेखन करत गुरुपौर्णिमा उत्सव साजरा करण्यात आला. तर गुरु पौर्णिमा म्हणजेच अतिशय उत्साही वातावरणात आपल्या गुरु विषयी भावना व्यक्त केल्या व सर्व गुरुचे दर्शन घेत आमच्या पाठीशी कायम आपला हात आपले आशीर्वाद राहावे .
या उपक्रमासाठी बालपणच्या प्रमुख व्यवस्थापक सौ . सोनाली मुंढे यांच्यासह शिक्षक , कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले . 
राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *