{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{"addons":1},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":true,"containsFTESticker":false}

आश्वी l झुंजार न्यूज

29 देशाचा सहभाग असणाऱ्या आंतरराष्ट्रीय आयमा अबॅकस ऑलिम्पियाड स्पर्धा २०२४ च्या स्पर्धेमधून संगमनेर तालुक्यातील पानोडी येथील 9 वर्षिय श्रेयस प्रविण आंधळे या विद्यार्थ्यांने ग्रेड डी मधून दुसरा क्रमांक मिळवून घवघवीत यश संपादन केले. 
या स्पर्धेत डी कॅटेगरी मध्ये डी सेकंड मध्ये श्रेयस प्रविण आंधळे याने तीन मिनिटात विविध विविध स्पर्धा परीक्षा देत आंतरराष्ट्रीय स्तरावर प्राविण्य  मिळवत चॅम्पियनशिप मिळविली. श्रेयस आंधळे हा विदयार्थी पुणे येथील ‘ केद्रींय विदयालय रेंजहिल्स ‘ या विदयालयात इयत्ता तिसरी मध्ये शिकत असून उत्कर्षा क्रिएशन मधून 9 महिने अबॅकसचे क्लास घेत 29 देशाचा सहभाग असणाऱ्या आंतरराष्ट्रीय आयमा अबॅकस स्पर्धेत श्रेयसने सहभाग घेवून विविध स्पर्धत प्राविण्य मिळविले ही स्पर्धा इंटरनॅशनल हॉटेल रॅडिसन ब्लू मुंबई येथे झाली .
या यशाबद्दल श्रेयस यांचे सर्व स्तरावरुन अभिनंदन होत आहे.
राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *