आश्वी । झुंजार न्यूज

संगमनेर तालुक्यातील वरवंडी येथील स्थापलिंग महाराज मंदिर डोंगरावर मेंढया चार असताना काही अपप्रवृत्तीच्या लोकांकडून मेंढपाळांना धक्काबुकी करुन मेंढया जख्मी केल्याचा प्रकार घडल्याने समाज्यातील काही सामाजिक कार्यकर्त्यांनी मेंढपाळाच्या मदतीला धाव घेत पोलिसांच्या मध्यस्तीने त्यांना न्याय मिळवून दिला .
 सदर मिळालेली माहिती अशी कि ,  रविवार दि 21/07/2024 रोजी राहुरी तालुक्यातील वावरथ जांभळी येथील मेंढपाळ कृष्णा बाचकर व सुनिल चोरमले हे मेंढपाळ वरवंडी (संगमनेर) येथील स्थापलींग डोंगरावर मेंढ्या चारत असतांना वरवंडी येथिल काही अपप्रवृत्तीच्या लोकांकडून काही कारण नसताना मेंढ्या जखमी करत मेंढपाळांना धक्काबुक्की करण्यात आली. ही झालेली घटना या मेंढपाळानी धनगर समाजाचे मनोहर टेंगळे , यशवंत सेना जिल्हा उपप्रमुख सुभाषराव हळनोर, एकनाथ बरकडे, गणेश खेमनर ,रविंद्र दातीर, अशोक ज-हाड या प्रमुख कार्यकर्त्यांच्या सदरची झालेली घटना कळविल्याने या कार्यकर्त्यांनी तातडीने आश्वी पोलिस स्टेशनमध्ये जावून सदरच्या मेंढपाळांना त्वरीत न्याय द्या अशी मागणी केल्याने परिस्थितीचे गांभीर्य ओळखून साहाय्यक पी आय पवार यांनी मेंढपाळाची फिर्याद घेवून तातडीने कारवाई करत अपप्रवृत्तीच्या आरोपीना ताब्यात घेवून त्यांना वर्दीचा हिसका दाखवत त्यांच्यावर कडक कारवाई केल्याने त्यांनी गुन्हयाची कबुल दिली .
मेंढपाळाच्या जख्मी केलेल्या मेंढयांनाच्या इलाजाकरिता संबंधीत लोकांकडून आर्थिक भरपाई देण्यात आली .तर पुन्हा अशा घटना घडता कामा नाही अशी तंबी देण्यात आली 
या मेंढपाळांना न्याय मिळवून देण्यात संगमनेर पोलिस उपधीक्षक सोमनाथ वाकचौरे , आश्वि पोलिस स्टेशनचे पी एस आय सोनवणे , सहाय्यक पी.आय.पवार यांच्यासह कार्यकर्त्यांनी मोठे सहकार्य केले
राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *