गडचिरोली । झुंजार न्यूज 

 

 

गडचिरोली जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या मार्फत गव्हमेंट नर्सेस संघटनेचे वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाला निवेदन पाठवण्यात आले.

 

 

 

गडचिरोली जिल्हा हा मागासवर्ग असून आदिवासी बहुल जिल्हा म्हणून ओढाखल्या जात आहे . दिंनांक १४ जुलै २०२३ च्या शासन निर्णयानुसार जिल्हा सामान्य रुग्णालयाचे कायम स्वरुपी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय गडचिरोली असे रूपांतर करण्यात आले. त्या अनुषंगाने जिल्हा रुग्णालयातील इच्छुक अधीपरीचारिका व परिसेविका यांना सार्वजनिक आरोग्य विभागातून वैद्यकीय शिक्षण विभागात सामावून घ्यावे अशी विनंती संघटनेने केली आहे.

 

 

तसेच नियमित पदभरती झाल्याने वर्षानुवर्षे गडचिरोली जिल्ह्यात सेवा देणाऱ्या बंधपत्रित अधीपरीचारिका यांच्यावर बेरोजगारीची वेळ आली आहे त्यामुळे त्यांना तात्पुरत्या स्वारुपात का होईना पण वैद्यकीय महाविद्यालय गडचिरोली येथे नियुक्ती द्यावी अशी देखील मागणी संघटनेने केली आहे.

 

याबाबत विविध समस्यांविषयी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रमोद खंडाते यांच्याशी सकारात्मक चर्चा करून संघटनेने निवेदन दिले. यावेळी संघटनेच्या अध्यक्ष रचना मकासरे, कोषाध्यक्ष कविता नांदगाये, कार्यकारी अध्यक्ष गजानन गेडाम, कार्याध्यक्ष उमेश वेलादी, आशा गायकवाड, साक्षी चुधरी आदित्य सरदार, पल्लवी निकुरे, ज्योती सिडाम, नैना सिडाम, अर्चना प्रधान, विशाल खरात, सनऊ शेख , नंदा वालको आदी सदस्य उपस्थित होते.

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *