आश्वी l झुंजार न्यूज
संगमनेर तालुक्यातील मांची हिल ( आश्वी बु॥ ) येथील अश्विन रुरल आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालयात संस्थेचे संस्थापक शाळीग्राम होडगर यांच्या संकल्पनेतून विश्वस्त डॉ. शैलेन्द्रसिंह होडगर, डॉ. दिग्विजयसिंह होडगर यांच्या मार्गदर्शनाखाली जेष्ठ नागरिकांसाठी भव्य आरोग्य तपासणी शिबीर उत्साहात संपन्न होवून २१४ जेष्ठ नागरिकांनी आरोग्यांची तपासणी केली .

या शिबिरात मान्यवरांच्या हस्ते धन्वंतरीची पूज्या करण्यात येवून शिबिरात सुरूवात झाली. यावेळी संगमनेर तालुका जेष्ठ नागरिक महासंघाचे अध्यक्ष सोमनाथ कळसकर गुरुजी, संगमनेर जेष्ठ नागरिक सेवा संघाचे अध्यक्ष डॉ. सोमनाथ सातपुते, महेश जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष गणेशलाल बाहेती, राजहंस जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष डॉ. जी.पी. शेख, कल्याणकारी जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष रत्नाकर पगारे, फेस्कॉमचे अहमदनगर विभागाचे अध्यक्ष शब्बीरभाई पठाण व प्रकल्प प्रमुख प्राचार्य ज्ञानेश्वर गोंटे, डॉ. संजीव लोखंडे, डॉ. शिवपाल खंडीझोड, अध्यक्ष विजय पिसे, उपाध्यक्ष आण्णासाहेब बलमे, हॉस्पिटलचे प्रशासकिय संचालक प्रा. दत्ता शिंदे , डॉ. राजन कुलकर्णी, डॉ. शुकाचार्य वाघमोडे, डॉ. संजय बालोटे, प्रा. किसन हजारे हे उपस्थित होते.

या प्रसंगी प्राचार्य विजय पिसे यांनी प्रास्ताविक करून उपस्थित जेष्ठ नागरिकांचे स्वागत केले. तसेच डॉ. संजीव लोखंडे यांनी आहार-विहार व दिनचर्या यावर मार्गदर्शन केले. डॉ. निशांत इंगळे यांनी रुग्णालयातील यशस्वी शस्त्रक्रिया व उपचार पद्धती यावर प्रेझेंटेशन दिले.

यावेळी डॉ. निशांत इंगळे, डॉ. अभिजित गायकवाड, डॉ. तेजस्विनी मोरे, डॉ. दिनेश पानगव्हाणे, डॉ. जयश्री कोल्हे, डॉ. मतीन शेख, डॉ. अमित ढोले, कर्ण विभागाचे डॉ. ऋषिकुमार यादव आदी तज्ञ डॉक्टरांनी उपस्थित रुग्णांची तपासणी करून उपचार केले.

यावेळी जेष्ठ नागरिकांच्या हस्ते मांची हिल परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. तर संस्थानकडून जेष्ठ नागरिकांना स्नेहभोजन देण्यात आले. संस्थानने केलेल्या आदरामुळे सर्व जेष्ठ नागरिक भारावून गेले. स्नेहभोजना नंतर शाळीग्राम होडगर यांनी उपस्थित जेष्ठ नागरिकांना मार्गदर्शन केले. शिबिराचा समारोप वंदे मातरम गीताने झाला. शिबीर यशस्वी करण्यासाठी रुग्णालयातील अधिकारी व कर्मचारी वर्ग यांनी विशेष परिश्रम घेतले.
Post Views: 777

