आश्वी l झुंजार न्यूज
प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली वंचित बहुजण आघाडीची ‘आरक्षण बचाव यात्रा’ 24 जुलै पासून सुरु झाली असून मोठा प्रतिसाद मिळताना दिसत आहे आता ही आरक्षण बचाव यात्रा 7 ऑगस्ट2024 रोजी औरंगाबाद येणार असल्याने या यात्रेत सर्वांनी सहभागी व्हावं, असं आवाहन वंचितचे राज्य प्रवक्ता उत्कर्षा रुपवते यांनी केले आहे.

आरक्षण बचाव यात्रा ही मुंबई , पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, अहमदनगर, उस्मानाबाद, लातूर, परभणी, नांदेड, हिंगोली, यवतमाळ, अमरावती, अकोला, वाशीम, बुलढाणा, जालणा आदी ठिकाणी झाली आता 7 ऑगस्टला औरंगाबाद येथे या यात्रेचा समारोप होणार आहे. तर विविध राजकिय नेत्यांनी या आरक्षण बचाव यात्रेत आपला सहभागी नोंदवून यात्रेचे स्वागत केले .

ओबीसी आणि मराठा आरक्षणाचे राजकारण सध्या सुरू असून, जातीय संघर्ष वाढत असल्याने राज्यात सलोखा निर्माण व्हावा आणि आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागावा यासाठी ही यात्रा आयोजित करण्यात आली होती .

आरक्षण बचाव यात्रेचे मुख्य उद्दिष्ट्ये ओबीसी आरक्षण वाचले पाहिजे , Sc /St विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती दुप्पट झाली पाहिजे , ओबीसी विद्यार्थ्यांना सुद्धा SC/ST प्रमाणे शिष्यवृत्ती मिळते, ती जशीच्या तशी लागू झाली पाहिजे , SC, ST आणि OBC ला पदोन्नतीत आरक्षण मिळाले पाहिजे , 100 ओबीसी आमदार निवडून आणणे , 55 लाख बनावट कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्यात यावी.
