आश्वी l झुंजार न्यूज 

संध्या भंडारदरा परिसरात होत असलेल्या पावसामुळे 
भंडारदरा धरण भरला आता निळवंडे धरण सुध्दा  भरण्याच्या स्थितीत असल्याने प्रवरा नदीपात्रासह उजव्या व डाण्या कालव्यानांही पाणी सोडले असून, यंदाच्या पावसाळ्यात प्रथमच संगमनेरमध्ये प्रवरा दुथडी भरून वाहत आहे. त्यामुळे तालुक्यातील धांरदरफळ, कासारवाडी, संगमनेर शहर, जोर्वे, रहिमपूर , ओझर  व आश्वीसह परिसरातील नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला मात्र गेल्या २४ तासानंतर अनेक गावांमध्ये पाणी शिरल्याने विट भट्टयासह अनेक पिके पाण्यात गेल्याचे चित्र दिसत आहे .
संगमनेर शहरातील गंगामाई घाट परिसरात संगमनेर खुर्दला जोडणारा छोटा पूल पाण्याखाली गेल्याने वाहतुकीस बंद करण्यात आला असून पुर्वेकडील ओझर खुर्द व ओझर बु॥ यांना जोडणारा पुल सुध्दा पाण्याखाली गेला . भंडारदरा परिसरात होत असलेल्या जोरदार पावसामुळे भंडारदरा भरला तर निळवंडे सुध्दा भरण्याच्या स्थितीत असल्याने लवकर निळवंडे उजव्या व डाव्या कालव्यांना सुध्दा पाणी येवू शकते . रविवारी दुपार नंतर प्रवरा नदी पात्रात  सोडलेले पाणी हे नदी काठच्या गावांमध्ये शिरले असून ऊस , टमाटे , बाजरी , सायबिन आदी पिकासह जोर्वेमधील बहुतांश विटभट्टया पाण्यात दिसू लागल्याने मालकांची मोठी ताराबंळ उडाल्या दिसत आहे .   
राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed