आश्वी l झुंजार न्यूज

 

राज्यातील महायुती शासनाच्या माध्यमातून सर्व सामान्य , महिला , शेतकऱ्यापर्यत अनेक योजना राबविल्या जात असून खऱ्या अर्थाने हे सरकार लोकहितकारी आहे तर मालुंजे , भोजदरी यांच्यासह संगमनेर तालुक्यात महायुतीच्या माध्यमातून प्रभावीपणे विकासाला चालना मिळत असल्याने आता तालुकाचं दत्तक घ्यावा लागेल असे मिश्कील टिप्पणी महसुल मंत्री तथा पालकमंत्री ना राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली .

 

 

संगमनेर तालुक्यातील मालुंजे येथील ६ कोटी २३ लाख रुपयेच्या विकास कामाचे शुभारंभप्रसंगी ना विखे पाटील बोलत होते या प्रसंगी जेष्ठ नेते दिलीपराव शिंदे , प स समिती माजी उपसभापती मच्छिद्र थेटे , प स समिती सदस्य गुलाबराव सांगळे , जेष्ठ नेते भगवानराव इलग , माजी संरपच संदिपराव घुगे , भारतराव गीते , डिग्रस संरपच अशोकराव खेमनर , जेहूरभाई शेख , रावसाहेब घुगे , नानासाहेब शिंदे , पांडूरंग सांगळे , शरद भालेराव , प्रदिप दादा घुगे , सोसायटी माजी चेअरमन भिमाबाई घुगे , महिला संरपच सौ सुवर्णाताई घुगे , विजय डोंगरे , प्रांत शैलेंद्र हिंगे , तहसिलदार धीरज मांजरे , गटविकास अधिकारी अनिल नागणे , बांधकाम अभियंता मिसाळ , उपविभागीय कार्यकारी अभियंता वर्पे , कृषी अधिकारी गायकवाड , ग्रामसेविका श्रीमती रुपाली कहाणे आदीसह पदाधिकारी , अधिकारी , ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते . 

 

 

ना विखे पाटील पुढे म्हणाले की , मालुंजे व परिसरातील गावे ही दुर्लक्षित होती आपल्या सानिध्यात आल्यापासून पेयजल योजना , रस्ते आदीसह विविध विकासाला चालना मिळू लागली , यापुर्वी झालेले रस्त्यांना त्वरीत खड्डे पडत असल्याचे दिसले . कारण ठेकेदार ही घरातीलचं असायची आता तसेच राहिले नाही महायुतीच्या काळात सर्वांना काम करण्याची संधी देण्यात आल्याने चांगली व स्वच्छ पध्दतीने कामे होवू लागली यात तालुक्यातील विविध विभागाच्या अधिकाऱ्यांची ही तप्तरता दिसून येत असून तालुक्यातील भोजापूर पाणी पुजनासह विविध नऊ ठिकाणी कार्यक्रम असल्याने आता तालुकाचं दत्तक घ्यावा लागेल व विकासात्मक घोडदौड करावी लागेल असे विखे पाटील शेवटी म्हणाले .

 

 

 

 

चौकट – १

 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली लोकाभिमुख योजना सुरु झाल्या त्यातील “लाडकी बहिण” ही योजना महिलाकरिता असल्याने काही लोकांना ही योजना सहन झाली नसून यावर टिका करायची व दुसरीकडे आपल्या कार्यालयामार्फत योजनेचे फार्म भरायचे अशी दुहेरी भूमिका तालुक्यातून होत आहे मात्र रक्षाबंधनाच्या दिवशी दोन महिन्याचा हप्ता दिला जाणार असून मालुंज्यातील ५७३ महिलांना सुध्दा यांचा लाभ मिळणार . . . 

 

ना . राधाकृष्ण विखे पाटील ( महसूल मंत्री )

 

 

चौकट – २

 

विशेष म्हणजे महायुती सरकारने ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ सुरू करून महिलांमध्ये एक नवा आत्मविश्वास निर्माण केला आहे, अशी भावना महिला भगिनी राखी बांधून व्यक्त करताना दिसल्या 

 

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed