{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{"addons":1},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":true,"containsFTESticker":false}

 

 

आश्वी l झुंजार न्यूज

 

आदिवासी समाज हा भारतातचं नव्हे तर संपुर्ण जगात असल्याने “आदीवाशी दिन ” हा फक्त भारत देशात नव्हे तर जगात सुध्दा मोठ्या उत्सवात साजरा केला जात असून आदीवाशी दिनाबरोबर आदिवासी समाजाला शैक्षणिक प्रवाहात आणणे गरजेचे असून आदिवासी समाज शैक्षणिक क्षेत्रात आल्यास खऱ्या अर्थाने समाजाची प्रगती होईल.असे मत राजहंस दूध संघाचे चेअरमन रणजीतसिंह देशमुख यांनी व्यक्त केले .

 

संगमनेर तालुक्यातील पिंपरणे व अंभोरे येथे आदीवाशी दिन साजरा करण्यात आला या प्रसंगी देशमुख बोलत होते . आदयक्रांतीकारक राघोजी भांगरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले  .

 

यावेळी रणजितसिंह देशमुख पुढे म्हणाले की , केवळ भारतातच नाही तर जगाच्या सर्व भागात आदिवासी समाजाचे लोक राहतात. त्यांची जीवनशैली, खाण्यापिण्याच्या सवयी, चालीरीती इत्यादी सामान्य लोकांपेक्षा भिन्न असतात. समाजाच्या मुख्य प्रवाहापासून दूर गेल्याने ते मागे पडले आहेत. या कारणास्तव भारतासह अनेक देशांमध्ये त्यांच्या उन्नतीसाठी, त्यांचा प्रचार करण्यासाठी आणि त्यांच्या हक्कांकडे लक्ष वेधण्यासाठी अनेक प्रकारचे कार्यक्रम राबवले जात असले तरी त्याच्या उन्नतीकरिता शैक्षणिक क्षेत्रात आणणे फार महत्वाचे असल्याचे मत देशमुख यांनी व्यक्त केले .

 


       

यावेळी अंभोरे व पिपंरणे येथील सरपंच-उपसरपंच , सेवा सोसायटीचे चेअरमन -व्हा-चेअरमन  ,विविध संस्थाचे पदाधिकारी ग्रामस्थ व आदिवासी बाधंव मोठ्या संख्खेंने उपस्थित होते. 

 

 

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed