थोरात कारखान्यावर सप्ताहात दीपोत्सव संपन्न !

संगमनेर l झुंजार न्यूज

 

 

सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या अखंड हरिनाम सप्ताहात होणारा दीपोत्सव हा ऊर्जा देणारा असून चांगले आरोग्याला अध्यात्माची जोड मिळाल्यास जीवनामध्ये आनंद निर्माण होतो असे प्रतिपादन कॅन्सरतज्ञ डॉ जयश्रीताई थोरात यांनी केले आहे

 

सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना व अमृत संस्कृतिक मंडळ यांच्या वतीने आयोजित अखंड हरिनाम सप्ताहात दीपोत्सव कार्यक्रमात त्या बोलत होत्या .यावेळी हरिभक्त परायण गोविंद महाराज करंजकर, हरिभक्त परायण चंद्रलेखा ताई काकडे, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर, कार्याध्यक्ष रामदास तांबडे, संदीप दिघे, ॲड. अशोक हजारे, अशोक कवडे ,संभाजी वाकचौरे, राजेंद्र बड आदी उपस्थित होते.

 

यावेळी बोलताना डॉ जयश्रीताई थोरात म्हणाल्या की, आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुक्यात विकास कामांबरोबर सामाजिक सांस्कृतिक सलोखा असून कला, क्रीडा याचबरोबर अध्यात्मक क्षेत्रातही मोठे काम होत आहे. मन शांतीसाठी अध्यात्माची गरज असते आणि चांगले आरोग्य करता नियमित आहार आणि व्यायाम याची गरज असते. या दोन्ही गोष्टी केल्या तर जीवनात नक्कीच आनंद मिळतो .

 

शिक्षण ,चांगले आरोग्य, चांगला आहार आणि अध्यात्म याबाबत महिलांनी आपल्या कुटुंबातील सर्व सदस्यांना प्रोत्साहित करावे असे आवाहन केले

 

तर कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर म्हणाले की अमृतेश्वर मंदिराच्या प्रांगनात अखंड हरिनाम सप्ताहाचा ही 39 व्या वर्षी आहे .या सप्ताह निमित्त सर्वजण एकत्र येतात एकमेकांच्या सुख दुखात सहभागी होतात. आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली अमृत परिवार हा काम करत असल्याचे ते म्हणाले

 

यावेळी रामदास तांबडे यांनी आभार व्यक्त केले दीपोत्सवासाठी कारखाना व परिसरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या

 

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed