{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{"addons":1},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":true,"containsFTESticker":false}

 

झरेकाठी l झुंजार न्यूज

 

 

प्रत्येकाने आई वडील जिवंत आहे तोपर्यंत त्यांची सेवा करा नेहमी त्यांच्या ऋणात राहुन परमार्थ करा आई वडिलांसारखे या जगामध्ये काहीच नाही,ज्याला आई वडील आहे त्याला या विश्वामध्ये कुठल्या प्रकारची कमी नाही असे प्रत्येक धर्मग्रंथात नमुद आहे कारण .तेच प्रत्येक मानवाचे अस्तित्व आहे ज्याला आई-वडील नाही त्याला आई-वडिलांची किंमत कळते असे प्रतिपादन रामायणाचार्य ह. भ .प. समाधान महाराज शर्मा यांनी केले.

 

 

 

संगनमेर तालुक्यातील झरेकाठी येथे अखंड हरिनाम सप्ताहाच्या काल्याच्या कीर्तनात ते बोलत होते.यावेळी….. समाधान महाराज शर्मा म्हणाले. श्रीकृष्णाचे चरित्र.हे आपल्याला जीवन जगताना अतिशय उपयोगी आहे कोणत्या प्रसंगी कोणता निर्णय घ्यावा आणि आपला चतुरपणा दाखवा ही कृष्णचरित्राच्या अभ्यासावरून कळते. मनुष्य जीवनामध्ये जन्म घेतल्यानंतर अहंकार करू नये मानवी जीवनाला एक दिवस मरण आहे याची कल्पना असायला पाहिजे नम्रता होऊन जीवन जगले पाहिजे. सप्ताह यशस्वी करण्यासाठी, भजनी मंडळ, ज्ञानेश्वरी ग्रंथवाचक मंडळी, ग्रामस्थ, सप्ताह कमिटी यांनी विशेष परिश्रम घेतले

 

 

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *