संगमनेर l झुंजार न्यूज
मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा दुर्घटना नुकसान प्रकरणी संबंधित अधिकारी व ठेकेदारावर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी निवेदनाद्वारे अखिल भारतीय सह्याद्री छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण कानवडे यांनी केली आहे.

महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा उभारलेला पुतळा अवघ्या आठ महिन्यात कोसळणे हे अत्यंत दुर्दैवी आणि वेदनादायी आहे. खरे तर महाराजांनी उभारलेले गड किल्ले हे चारशे वर्षापासून तसेच आहेत आणि या भ्रष्टाचारी अधिकारी व ठेकेदाराने उभारलेला पुतळा अवघ्या आठ महिन्यात कोसळला आहे. यामुळे आम्हा तमाम शिवप्रेमी नागरिकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. महाराजांचा पुतळा उभारताना यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात त्रुटी आढळून आले आहे पुतळ्या साठी वापरण्यात येणारे मटेरियल निकृष्ट दर्जाचे असल्याचे आढळून आले आहे त्यामुळे यामधील ठेकेदार आणि भ्रष्टाचारी यांना कडक शिक्षा झाली पाहिजे. भविष्यात अशी दुर्घटना महापुरुषांच्या पुतळ्या बाबत पुन्हा घडणार नाही यासाठी कडक उपाययोजना शासनाने कराव्यात अशी मागणी करण्यात आली.

नौदल हे सागरी किनाऱ्याचे रक्षण करते मात्र त्यांनी पुतळा उद्घाटनानंतर कुठल्याही प्रकारचे लक्ष घातले नाही. महाराजांच्या पुतळ्याची देखभालीसाठी जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे होती त्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येते. ठेकेदार आणि भ्रष्टाचारांना कडक शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी अखिल भारतीय सह्याद्री छावा संघटना वतीने अध्यक्ष विलास नवले, मारुती सोनवणे, एकनाथ नाना शेळके राहुल राऊत, गणेश गुंजाळ, सचिन गाडे,दिनकर घुले, आदींचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी निवेदन दिले आहे .

