{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{"addons":1},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":true,"containsFTESticker":false}

 

 

निळवंडे मुळे समृद्धीचा मार्ग खुला : आ. थोरात

 

 

बाजार समितीची 20 वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न

 

संगमनेर l झुंजार न्यूज

 

 

हरितक्रांतीतून उत्पादित झालेला शेतीमालाच्या विक्री व्यवस्थेसाठी यशवंतराव चव्हाण यांच्या पुढाकारातून बाजार समित्यांची स्थापना झाली मात्र  सरकारने या समित्यांचे महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न केला. तरीही अशा अडचणीच्या काळामध्ये संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीची प्रगती आणि वाटचाल कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार विधिमंडळ पक्षाचे नेते तथा मा. कृषीमंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी काढले असून निळवंडे धरण व कालव्यांमुळे तालुक्यात समृद्धीचा मार्ग खुला झाला असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

 

 

सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या 20 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते यावेळी अध्यक्षस्थानी सभापती शंकर पा. खेमनर होते तर व्यासपीठावर मा. आ. डॉ. सुधीर तांबे, बाजीराव पा. खेमनर, सौ दुर्गाताई तांबे, रणजीतसिंह देशमुख, सुधाकर जोशी, संपतराव डोंगरे, मिलिंद कानवडे, रामहरी कातोरे, संतोष हासे, आर.बी राहणे, उपसभापती गीताराम गायकवाड, संचालक कैलास पानसरे ,मनीष गोपाळे ,सौ रुक्मिणी साकोरे, सतीश खताळ, विजय सातपुते, सुधाकर ताजने ,अनिल घुगे, सौ दिपाली वर्पे, सुरेश कान्होरे, अरुण वाघ, सखाराम शरमाळे, संजय खरात, निलेश कडलग, मनसुख भंडारी, निसार शेख, सचिन करपे, बाजार समितीचे सचिव सतीश गुंजाळ आदी उपस्थित होते.

 

यावेळी बोलताना आमदार थोरात म्हणाले की, सध्याच्या केंद्र सरकारने  बाजार समितीचे महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न केला. यासाठी तीन काळे कायदे तयार केले. या कायद्याविरुद्ध हरियाणा ,पंजाब, उत्तर भारतातील शेतकऱ्यांनी मोठा लढा दिला आणि केंद्र सरकारचा डाव हाणून पाडला.

 

अनेक अडचणी असतानाही आपल्या बाजार समितीने अत्यंत चांगली वाटचाल केली असून वडगाव पाण येथे सुरू केलेल्या मार्केटमध्ये कांद्याची मोठी आवक होत आहे.

 

 

महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये नाशिक पुणे रेल्वे वडगाव जवळून नेण्यासाठी आपण सातत्याने पाठपुरावा केला मात्र काही लोक संगमनेर तालुक्यातून जाणारी रेल्वे इतरत्र वाढवण्यासाठी धडपड करत आहेत .त्यांचा काळ अवघा दोन-तीन महिन्याचा आहे. त्यानंतर आपले सरकार राहणार असून रेल्वे सह इतर प्रश्न मार्गी लागतील.

 

 निळवंडे धरण व कालवे आपणच केले ज्यांनी मदत केली नाही, खोडा घालण्याचा प्रयत्न केला ते आता फोटो काढून मिरवतायेत. परंतु काम कोणी केले हे जनतेला माहिती आहे. निळवंडे धरण व कालव्यांमुळे तालुक्यात समृद्धी वाढली असून उर्वरित चाऱ्यांची कालवे ही आपणच करणार आहोत असेही ते म्हणाले

 

तर मा आमदार डॉ तांबे म्हणाले की, केंद्र व राज्य सरकारचे धोरण अगोदर लूट करायची आणि मग निवडणुकीच्या काळामध्ये प्रसाद द्यायचा असं सुरू आहे. शेतकरी हा भारताच्या अर्थव्यवस्थाचा कणा आहे .अत्यंत महत्त्वाची भूमिका असलेल्या शेतकऱ्यांना मात्र कायम दुय्यम वागणूक दिली जात आहे.संगमनेर हे आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली देशासाठी सहकाराचे उत्तम मॉडेल ठरले असल्याचे ते म्हणाले

 

तर सभापती शंकर पाटील खेमनर म्हणाले की, आ. थोरात यांच्या नेतृत्वाखाली बाजार समितीने चांगली वाटचाल करताना वडगाव पान येथे मोठे मार्केट उभे केले आहे. 1000 टनाचे वेअर हाऊस त्या ठिकाणी होणार असून उत्पन्न वाढवण्यासाठी पेट्रोल पंप सुरू केला आहे. आगामी काळामध्ये निमोन येथे लूज कांद्याचे मार्केट तयार होणार असून मागील आर्थिक वर्षात बाजार समितीला 68 लाख रुपयांचा नफा झाले असल्याचे ते म्हणाले.

 

 यावेळी नवनाथ आरगडे, राजेंद्र चकोर, राजेंद्र कडलग, विष्णुपंत राहटळ, सुहास आहेर, जगन्नाथ घुगरकर, चंद्रकांत कडलग, सौ मीराताई शेटे, आदींसह अमृत उद्योग समूहातील विविध पदाधिकारी उपस्थित होते.

 

वार्षिक सर्वसाधारण सभेचे नोटीस वाचन सचिव सतीश गुंजाळ यांनी केले सूत्रसंचालन नामदेव काहांडळ यांनी केले तर उपसभापती गीताराम गायकवाड यांनी आभार मानले. यावेळी विविध संस्थांचे पदाधिकारी, शेतकरी, व्यापारी,  हमाल मापाडी  मोठ्या संख्येने उपस्थित होते..

 

 

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed