आश्वी l झुंजार न्यूज
संगमनेर प्रांत कार्यालयात नुकत्याचं झालेल्या शांतता कमिटीची मीटिंगाला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( आठवले ) या पक्षाला निमंत्रीत करण्यात आले नसल्याने ही शांतता बैठक सर्व पक्षीय नसून एकतर्फी आहे काय ? असा सवाल रिपाई शहराध्यक्ष कैलास कासार यांनी प्रसिध्दी पत्रकाद्रारे केला .

प्रसिध्दी पत्रकात कासार पुढे म्हणाले की , यापूर्वी झालेल्या शांतता कमिटी बैठकी करिता असे कधी घडले नाही विविध सण , उत्सवाकरिता ही शांतता बैठक असते ती सर्वपक्षीय , सर्व संघटना यांना निमंत्रण करून घेतली जाते . पण नुकत्याचं झालेल्या मीटिंगमध्ये हातावर मोजण्या इतक्याचं पक्षीय पदाध काऱ्याना बोलविण्यात आल्याचे चित्र दिसले . बाकी पदाधिकाऱ्यांना जाणून-बुजून डावण्यात आलंय की काय संशय निर्माण झाला आहे.

समाजामध्ये सर्व घटकांना सोबत घेऊन काम करताना सर्व सण उत्सव साजरे केले जातात जातीसलोख्यातून सर्वजण गुण्या गोविंदाने आनंदाने एकत्रितपणे काम करतो कुठेही अनुचित प्रकार होऊ नये हे सर्वजण काळजी घेतात.. आणि घेतलीच पाहिजे कारण की हे शहर आपलं सर्वांचं आहे. कुठलाही सण आला की आपण शांतता कमिटीची मीटिंग भरवतो कारण की शहरांमध्ये शांतता टिकून राहावी. हेचं धोरण असते . पण नुकत्याचं झालेल्या शांतता बैठकीकरिता डावलण्यात आल्याचे निदर्शनात आल्याने या झालेल्या बैठकीचा रिपब्लिकन पक्ष विरोध करत असल्याचे कैलास कासार यांनी सांगितले .

