विविध रस्त्यांचे डांबरीकरण होणार
संगमनेर l झुंजार न्यूज
राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य तथा विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या पाठपुराव्यातून संगमनेर तालुक्यातील विविध रस्त्यांच्या मजबुतीकरण व डांबरीकरण कामांसाठी जिल्हा वार्षिक योजना 2024- 25 अंतर्गत ग्रामीण रस्ते विकास व मजबुतीकरण योजनेतून विविध रस्त्यांच्या डांबरीकरण व मजबुतीकरणासाठी 2 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाले असल्याची माहिती थोरात कारखान्याचे संचालक इंद्रजीत भाऊ थोरात यांनी दिली आहे.

याबाबत अधिक माहिती देताना इंद्रजीत भाऊ थोरात म्हणाले की, संगमनेर तालुक्यात 171 गावे व 248 वाड्या वस्ती आहेत. या सर्व गावांमध्ये आमदार थोरात यांच्या माध्यमातून सातत्याने विकासाच्या योजना राबवल्या जात आहेत. लेखाशीर्ष ३०५४ जिल्हा वार्षिक योजना 2024- 25 अंतर्गत ग्रामीण रस्ते विकास व मजबुतीकरणासाठी आमदार बाळासाहेब थोरात यांच्या पाठपुराव्यातून २ कोटी निधी मिळाला आहे.

या अंतर्गत मौजे पारेगांव बु ते काकडवाडी तळेगांव रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण करणेसाठी 40 लाख रुपये, नांदुरी दुमाला ते मिर्झापूर रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण करणेसाठी 30 लाख रूपये , मेंगाळवाडी (काशिबाई ते चिमटा) ते रामा-65 रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण करणेसाठी 30 लाख रूपये, रामा- 665 सांगवी पतींगबाबा ते कौठे धांदरफळ रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण करणेसाठी 25 लाख रूपये, सुप्रिम हाॅटेल ते वेल्हाळे रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण करणेसाठी 50 लाख रूपये तसेच तिगांव ते कांदळकर वस्ती रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण करणेसाठी 25 लाख रूपये असा एकूण 2 कोटी रुपयांचा निधी मंजुर झाला आहे.

यावेळी निधीमधून सदर गावांमधील रस्त्यांची मजबुतीकरण व डांबरीकरणाचे काम होणार आहे. त्यामुळे तालुक्यात अधिक मजबूत रस्त्यांचे जाळे निर्माण होणारा असून या रस्त्यांच्या कामासाठी निधी दिल्याबद्दल पारेगांव बु, नांदुरी दुमाला, मेंगाळवाडी, कौठे धांदरफळ, वेल्हाळे, तिगांव आदी मधील नागरिकांनी काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या आभार व्यक्त केले आहे
