आश्वी | झुंजार न्यूज
आश्वी व परिसरात कै.बाळासाहेब विखे पाटलापासून सर्व जाती – धर्माच्या लोकांना बरोबर विविध संस्थेच्या माध्यमातून ५० – ६० वर्षाच्या कालखंडात एक कौटुबिक वात्सल्य निर्माण केले प्रत्येकांच्या सुखा – दुःखात आपण सहभागी झालो. मग हा जातीय तेढ निर्माण करून सामाजिक शांतता भंग निर्माण करुन गोर – गरिब माणसावर जोर निर्माण करणाऱ्यांनी जातीय सलोखा राखा अन्यथा गय नाही असा कडक शब्दात माजी खासदार डॉ सुजय विखे पाटील यांनी सामाजिक तणाव निर्माण करणाऱ्यांना फटकारले .
संगमनेर तालुक्यातील आश्वी बु॥ येथील अशोक जऱ्हाड यांच्या वस्तीवर डॉ सुजय विखे पाटील युवा मंचच्या बैठकीप्रसंगी डॉ विखे पाटील बोलत होते . यावेळी अशोकराव जऱ्हाड , भिमा शिंदे , शिबलापूर उपसंरपच सुनिल मुन्तोडे , दिपक रक्टे , विजय मुन्तोडे , सुशिल भंडारी , नवनाथ ताजणे , अनिल म्हसे , विजय म्हसे , संपत भूसाळ , वैभव ताजणे आदीसह परिसरातून मोठया संख्येने युवक कार्यकर्ते उपस्थित होते .
डॉ सुजय विखे पाटील पुढे म्हणाले की , एखादा कोणी तरी आपल्या मोबाईल वेडा वाकडा स्टेटस ठेवतो त्यातूनचं सामाजिक तणाव निर्माण होवून तालुका , गांव बंद होते विनाकारण जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न होतो . युवकांनी या गोष्टीचा भान ठेवला पाहिजेल की , आपल्या मुली , बहिणी या असुरक्षित होत असल्याचे चित्र निर्माण करु नका . आपण छत्रपतीचे मावळे आहोत .
कै . बाळासाहेब विखे पाटील यांच्यापासून ना.विखे पाटील व मी असा आपल्या कार्यकर्ताचा संच उभा आहे . नव नविन तरुण हे सामाजिक व राजकिय प्रवाहात सामिल होत आहे त्यांना सुध्दा काम करण्याची संधी मिळाली पाहिजेल. त्यामुळे काही जण नाराज होतील नाराज होवू नका आता संघटनात्मक कामावर भर दिला पाहिजेल. आपण आधुनिक काळाकडे वाटचाल करत असल्याने एक परिवर्तनाची दिशा ठरवण्याकरिता एक स्वतंत्र व्यासपिठ निर्माण करण्यासाठी १८ ते ३० वयोगटातील युवकांकरिता एक बारकोड ॲप तयार करण्यात आला असून त्यात आपले नाव नोंदवून आपल्या गावातील विकासाकामाबात व असणाऱ्या समस्या मांडायच्या आहे . याकरिता कार्यालया येण्याची आवश्यकता नाही .
आश्वी बु ॥ गावांचा सरपंच , उपसरपंच कोणी असो माझा कोणी ही विरोधक नाही मी लोकांचं काम करण्यासाठी राजकारणामध्ये आलो आहे आपण काम करूनच मत परिवर्तन करू शकतो ही भुमिका माझी आहे त्याकरिता ग्रामपचायत सत्ता आवश्यक नाही . कार्यकर्त्यांनी सुध्दा हीचं भूमिका ठेवावी . व सामान्य माणसाचे काम करावे त्याला न्याय मिळवून दयावा यातूनचं माणुस – माणुस जोडला जातो . राजकारणात जय – पराजय होत असतो . आज माझ्या पदरी पराजय तर उदया दुसऱ्यांच्या पदरात पराजय असतो . मात्र मानसिकता चांगली असावी . पराजय झाल्यावर आनंद व्यक्त होतो हे पहिल्यादा आपल्या परिसरात बघावयास मिळाला .
यावेळी डॉ सुजय विखे पाटील यांची फुले उधाळून सत्कार करण्यात आल्याने यांचे अनेक उदाहरणे देत दिसतं तसे नसते यांचा मोठा अनुभव आल्याने शंभर बेजबाबदार सांभाळण्या पेक्षा एकचं भरोसाचा कार्यकर्ता बरा असे डॉ विखे म्हणाले
कोणी व्यक्ती जर जाती आणि धर्माच्या नावावर गावामध्ये विष कालवत असेल तर त्याची ताबडतोब माहिती दया . गेल्या ७० वर्षात या परिसरात धर्माच्या किंवा जातीच्या नावावर कधी भेंदभाव झाला नाही मुस्लीम , हिंदू , माळी , मातंग , वंजारी , धनगर , दलित सर्व एका छताखाली भावाप्रमाणे राहिले मग अचानक जातीय तेढ कसा निर्माण झाला याचा शोध घ्यावा लागेल तर आपण सर्व समाज्याला बरोबर घेवू जात आहोत विश्वासार्थ निर्माण करा हा इकडे , तो तिकडे म्हण्यापेक्षा त्या व्यक्तीचा विश्वास निर्माण करा व चांगल्या भावनेने काम करा .
डॉ सुजय विखे पाटील ( माजी खासदार )

