मुंबई l झुंजार न्यूज
विधानसभा निवडणूक ही भाजपसाठी अतिशय मह्त्त्वाची ठरल्याने लोकसभा निवडणुकीचा राज्यातील निकाल पाहिल्यानंतर भाजपने आता कंबर कसलंय. राज्यातील प्रचाराची धुरा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यावरही विधानसभा निवडणुकीची जबाबदारी असणार आहे.
फडणवीस , गडकरींसह भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे प्रचाराची रणनिती ठरवणार असून या नेत्यांसह रावसाहेब दानवे यांच्याकडे विधानसभा निवडणुकीचे संयोजक ही जबाबदारी देण्यात आलीय.
या निवडणुक संयोजन समितीमध्ये नारायण राणे, राधाकृष्ण विखे पाटील , सुधीर मुनगंटीवार, पंकजा मुंडे, विजया रहाटकर , चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, अशोकराव चव्हाण, रवींद्र चव्हाण , प्रवीण दरेकर, भाई गिरकर, अशोक नेते , अतुल सावे, संजय कुटे, जयकुमार रावळ, रक्षा खडसे आणि मुरलीधर मोहोल यांचा समावेश आहे.
