आश्वी l झुंजार न्यूज
लोकनेते डॉ. बाळासाहेब साहेब विखे पाटील (पद्मभूषण उपाधीने सन्मानित ) प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या कला, वाणिज्य ,विज्ञान व संगणकशास्त्र महाविद्यालय आश्वी खुर्द मध्ये मा. डॉ. राधाकृष्ण विखे पाटील( मंत्री महसूल पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास महाराष्ट्र राज्य) यांच्या संकल्पनेतून व मा. खासदार डॉ.सुजय दादा विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली साकारलेल्या ‘एक गाव एक गणपती’ प्रवरा सांस्कृतिक व क्रीडा महोत्सव २०२४ च्या संयुक्त विद्यमाने मंगळवार दिनांक ३|९|२०२४ रोजी सकाळी ठीक १०.०० वा. महाविद्यालयात एक दिवशीय पर्यावरण पूरक गणपती बनवण्याची कार्यशाळा महाविद्यालयाचे कॅम्पस डायरेक्टर डॉ .महेश खर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या उत्साहात संपन्न झाली.

या कार्यशाळेचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. दाभाडे देविदास यांनी केले . पर्यावरण पूरक गणपती बनविणे ही काळाची गरज आहे या कार्यशाळेच्या माध्यमातून निसर्ग आणि मानव यांचे नाते दृढ होणार आहे असे प्रतिपादन केले .
कार्यशाळेसाठी कला शाखा समन्वयक डॉ. सुवर्णा जाधव ,वाणिज्य शाखा समन्वयक डॉ. घोलप अविनाश विज्ञान शाखा समन्वयक डॉ. भुमकर सोमनाथ तसेच कार्यशाळेच्या समन्वयक प्रा. सुनंदा पाचोरे कार्यशाळेची सदस्य डॉ. सारिका रोहमारे, प्रा. ब्राह्मणे शेखर, प्रा. पर्वत निलेश सांस्कृतिक कमिटीचे चेअरमन प्रा. शिंदे अमित व सर्व सहकारी प्राध्यापक व कर्मचारी सेवक वर्ग उपस्थित होते .
याप्रसंगी प्रवरा माध्यमिक स्कूल उंबरी बाळापूरचे सहशिक्षक व महाविद्यालयाची माजी विद्यार्थीनी स्वाती बोंद्रे यांनी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना गणपती बनविण्यासाठी सहप्रयोग प्रात्यक्षिक करून दाखविले. कार्यशाळेच्या दुसऱ्या सत्रात विद्यार्थी- विद्यार्थिनींनी निर्मित मातीच्या गोळ्या पासून गणपती तयार करण्याची स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये ७० विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला या कार्यक्रमाचे आभार कार्यशाळेचे समन्वयक प्रा.सुनंदा पाचोरे यांनी मानले. याप्रसंगी महाविद्यालय विद्यार्थी विद्यार्थिनीं यांनी निर्मिती कौशल्याचा अनुभव घेतला.

