यशोधन कार्यालयात जयंतीनिमित्त अभिवादन
संगमनेर | झुंजार न्यूज
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श घेऊन ब्रिटिशांविरुद्ध देशवासीयांना एकत्र करून सातपुडा ते सह्याद्री या परिसरात इंग्रजांविरुद्ध बंड पुकारून त्यांना सळो की पळो करून सोडणारे आद्यक्रांतिकारक राजे उमाजी नाईक यांचे स्वातंत्र्य लढ्यात मोठे योगदान असल्याचे गौरवोदगार विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी काढले आहे.

यशोधन जनसंपर्क कार्यालय येथे उमाजी राजे नाईक यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्रीताई थोरात, उमाजी राजे नाईक समाज सुधारक मंडळाचे जिल्हाध्यक्ष संजय चव्हाण, प्रवक्ते देवराम गुळवे, कार्याध्यक्ष तानाजी शिरतार, सचिव रमेश गफले, रमेश जेडगुले, नंदकुमार बोराडे, रोशन गोफने,धनंजय चव्हाण, प्रशांत चव्हाण, सुनील गुळवे, सचिन जेडगुले, महेश गोफने, सुनील गोफने ,जालिंदर गोफने ,रुपेश गोफने, विशाल गोफने,प्रा. बाबा खरात, श्रीराम कुऱ्हे, सुरेश झावरे, ज्ञानेश्वर राक्षे, आदींसह विविध मान्यवर उपस्थित होते.

पुढे बोलताना आमदार थोरात म्हणाले की, पहिल्या उठावाद्वारे ब्रिटिशांना सलग 14 वर्षे सळोकी पळो करून सोडणारे सर्वप्रथम क्रांतीचा स्वप्न पाहणारे महाराष्ट्रातील निधड्या छातीचे वीर आद्य क्रांतिकारक उमाजी नाईक यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श घेऊन सातपुडा ते सह्याद्री या डोंगर पर्वत रांगांमधील सर्व जाती धर्मातील लोकांना सोबत घेतले. पारंपारिक हेर ही कला आत्मसात करून दांडपट्टा, तलवार, भाला, कु-हाडी, तीरकामठा, गोफन चालवण्याची कला ही त्यांनी अवगत केली.

उमाजी राजे यांनी ब्रिटिश मोठे सावकार वतनदार यांना लुटून गोरगरिबांना आर्थिक मदत केली. महिलांवर अत्याचार झाल्यास ते भावासारखे धावून जाऊ लागले. छोटे सैन्य असताना सुद्धा अनेक वेळा ब्रिटिशांवर विजय मिळवला. त्यांचे भारतीय स्वातंत्र्य लढ्यात अत्यंत मोलाचे योगदान असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले

तर डॉ जयश्रीताई थोरात म्हणाले की, महाराष्ट्राला शूर वीरांची परंपरा आहे. यामधील महत्त्वाचे नाव म्हणजे उमाजी नाईक असून 300 लोकांना सोबत घेऊन वर्षानुवर्ष ब्रिटिशांविरुद्ध लढणाऱ्या आपण उमाजी नाईक यांच्या प्रेरणादायी विचारांचे अनुकरण तरुणांनी करावे असे आवाहन केले.

याप्रसंगी नरवीर उमाजी नाईक समाज सुधारक मंडळाचे विविध पदाधिकारी उपस्थित होते
