◻️ गणेश उत्सवामुळे दर्शनासाठी भाविकांची मांदियाळी
आश्वी l झुंजार न्यूज
संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्द येथिल ऐतिहासिक पेशवेकालीन गणेश मंदिरात कलाशिक्षक के. पी. तांबे यांनी बनविलेल्या पर्यावरण पुरक शाडूच्या गणेश मूर्तीची विधिवत स्थापना करण्यात आली आहे.

पेशवाई काळात येथील प्रवरा नदीवर असलेल्या घाटावर पेशवेच्या घोडे बांधण्याच्या पागा होत्या. यामुळेचं कालांतराने गावाला आधी आश्व त्यानंतर आश्वी असे नाव पडल्याचे जुनी जाणती मंडळी सांगतात. याचं कालखंडात पेशव्यांनी प्रवरा तिरानजीक भव्य गणेश मंदिर बांधले. त्यामुळे या मंदिराला ऐतिहासिक महत्व प्राप्त झाले.

काही वर्षापूर्वी गावातील तरुणांनी ग्रामस्थ व ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाखाली या गणपती मंदिराचा जिर्णोद्धार केला आहे येथील गणेश मुर्ती स्वंयभु असुन दरम्यान नवसाला पावणारा गणपती अशी परिसरातील भावीकांची श्रध्दा असल्याने मोठ्या प्रमाणात भाविक दर्शनाला येत असतात.

दरम्यान कला शिक्षक के. पी. तांबे यांनी शाडुच्या मातीची सुदंर गणेश मुर्ती तयार करत त्यावर नैसर्गिक रंग देत मनमोहक मुर्ती तयार केली. त्या मुर्तीची गणेश चतुर्थीनिमित्त मंदिरात विधिवत स्थापना करण्यात केली.

याप्रसंगी के. पी. तांबे, माजी उपसरपंच संजय गायकवाड, सौ. जयश्वी गायकवाड, माजी सरपंच म्हाळु गायकवाड, मोहन गायकवाड, ह.भ.प. सचिन गायकवाड, दिलीप मांढरे, आण्णा मांढरे, नानासाहेब गायकवाड, गुरु नितिन भाले, गंगा म्हस्के, कृष्णा हारदे, सचिन पोपळघट, ऋषिकेश डमाळे आदि उपस्थित होते. तर गणेश उत्सवामुळे मंदिरात दर्शनासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याचे चित्र आहे.
