{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{"addons":1},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":true,"containsFTESticker":false}

 

◻️ विविध सामाजिक संदेश देणाऱ्या देखाव्यांची आश्‍वी पंचक्रोशीत चर्चा

 

 

आश्‍वी l झुंजार न्यूज

 

 

संगमनेर तालुक्यातील आश्‍वी खुर्द येथील दातीर कुटुंबाने गौराईची स्थापन करत ‘बेटी बचाव, बेटी पढाव’ यासह विविध सामाजिक संदेश दिले आहेत. त्यामुळे हा सुंदर संदेश देणारा देखावा पाहण्यासाठी व दर्शनासाठी भाविक महिला आणि मुली त्यांच्या घरी गर्दी करत आहेत.

 

 

 

दीपक दातीर, पत्नी ज्योती दातीर व त्यांची दोन मुले यांच्या संकल्पनेतून दातीर कुटुंबाने गौराई निमित्ताने सामाजिक संदेश देणाऱ्या देखाव्यांची निर्मिती केली आहे. यामध्ये महिला सुरक्षेचा मुद्दा प्रामुख्याने रेखाटण्यात आला असून याठिकाणी राजमाता जिजाऊ माँसाहेब, झांसीची राणी लक्ष्मीबाई, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले, दिवंगत महिला पंतप्रधान इंदिरा गांधी तसेच भारतीय वंशांच्या पहिल्या अंतराळवीर महिला कल्पना चावला यांचे फोटो लावुन त्यांचा आदर्श घेण्याचे आवाहन महिला आणि मुलींना करण्यात आले आहे. त्याबरोबर अत्याचार, ॲसिड हल्ला, सासरी होणारा महिलांचा छळ, गर्भातचं मुलींची भ्रुण हत्या यावर या देखाव्यांच्या माध्यमातून भाष्य करण्यात आले आहे.

 

 

दरम्यान हा सुंदर देखावा निर्मितीसाठी जयललित तक्ते यांनी परिश्रम घेतले. मागील अनेक वर्षापासून दातीर कुटुंब हे गौराईची स्थापना करत आहे. यावर्षी त्यांनी सामाजिक संदेश देण्याबरोबरच गौराई निमित्त आकर्षक फुलांची सजावट, नैवेद्याची अप्रतिम मांडणी केलेली असल्याने हा देखावा पाहण्यासाठी आश्‍वी पंचक्रोशीतील भाविक महिला आणि मुली गर्दी करत आहेत.

 

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *