आश्वी l झुंजार न्यूज
जैन धर्मातील अत्यंत पवित्र व मोठा सण क्षमापणा पर्व संवत्सरी आश्वीत मोठ्या उत्साहात संपन्न.
श्री वर्धमान श्वेतांबर स्थानक वासी जैन श्रावक संघ आश्वी च्या आनंद दरबार मध्ये जैन धर्माचा स्वाध्यायी (धर्म प्रचारक) संगिताजी बंब पुणे,सरलाजी कांकरिया घाटकोपर मुंबई, यांचा उपस्थित मन व शरीर पवित्र व निर्मळ शुध्द बनण्यासाठी जप तप व धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते .
दररोज सकाळी प्रतिक्रमण, प्रार्थना, जैन धर्माचे २४वे तिर्थंकर भगवान महावीर यांनी दिलेला उपदेश अंतरगड सूत्र,कल्पसुत्र चे वाचन ,व्याख्यान ,धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रम, धार्मिक प्रश्नमंजुषा, सायंकाळी प्रतिक्रमण असे विविध धार्मिक कार्यक्रम आठ दिवस श्रावक संघाचे अध्यक्ष सुमतीलाल गांधी यांच्या मार्गदर्शन संपन्न झाले.रविवारी सर्व जैन धर्मियांनी आपले व्यवसायीक प्रतिष्ठान बंद ठेवत जप तप करत विश्वातील सर्व प्राणिमात्र ला त्यांचा कळत नकळत झालेल्या त्रासाबद्दल माफी मागत क्षमापणा पर्व, विश्वमैत्री पर्व साजरा केला .
यावेळी सुमतीलाल गांधी,वसंतलाल गांधी, प्रकाशलाल मुथ्था,ईश्वर भंडारी,राजेंद्र लुणीया,दिलीप लुंकड, विलास भंडारी,विनीत गांधी,दिपक बोरा,प्रशांत गांधी,दिलीप पटवा ,रमेश चोपडा,नवलमल भंडारी,चंपालालजी बोरा,अमरचंद गांधी,सुमतीलाल रातडीया,धनराजजी गांधी,प्रकाशलाल गांधी,योगेश रातडीया, अभिजीत गांधी,किशोर पटवा, रोहित भंडारी, पंकज नाके,निलेश रातडीया,अमित भंडारी, सुशील भंडारी,मंगेश रासने,आश्वीन मुथ्था,नितीन गांधी, मिलिंद बोरा,निलेश चोपडा,समीर गांधी,सागर रातडीया, यश भंडारी,अविनाश गांधी, गौतम गांधी सह जैन बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
