{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{"addons":1},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":true,"containsFTESticker":false}

 

 सावळीविहीर

 

 

व्यवसायात जिद्द चिकाटी व आत्मविश्वास ठेवल्यास व्यवसायात यश निश्चित असल्याचे माजी खासदार डॉ.सुजय दादा विखे पाटील यांनी मत व्यक्त केले काल ते शिंगवे-पिंपळवाडी येथील साईसखा उद्योग समूहास भेट देत हितगूज केले यावेळी ते बोलत होते. 

 

 

  याप्रसंगी डॉ.सुजय दादा विखे पाटील याचे प्रयत्नातून शिंगवे-पिंपळवाडी शिव रस्ता म्हसोबा मंदिरापर्यंत रस्ता  मुरमीकर कामाची पहाणी केली व नंतर त्या रस्त्यावर असणाऱ्या शिर्डी येथील संतोष कोंडाजी गोंदकर यांचे साईसखा उद्योग समूहाच्या विवीध उपक्रमांना  भेट देत पहाणी केली. यावेळी साईसखा ने उभारलेले प्रकल्प जनतेच्या सेवेत प्रेरणादाई ठरतील व शिंगवे पिंपळवाडी परिसरातील जनतेला पिण्याचे स्वच्छ पाणी  देउन आरोग्यासाठी हातभार लागणार असल्याचे यावेळी सांगितले.  शिर्डी तील गोंदकर कुटुंबियांनी साई बाबा चा आशीर्वादाने चालू केलेले हे काम समाजात नावलौकिक मिळवील असा आत्मविश्वास यावेळी व्यक्त करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

 

 

 त्यानंतर साईसखा उद्योग समूहाचे अध्यक्ष संतोष कोंडाजी गोंदकर,स्वातीताई संतोष गोंदकर ,तानाजी गोंदकर कांचनताई  गोंदकर,  सोनालीताई संतोष सालपूरे, सुनिताताई वसंत गोंदकर ,तन्मय गोंदकर, सार्थक गोंदकर, सुदर्शन गोंदकर यांचे परिवाराचे वतीने डॉ सुजय दादा विखे यांचा सत्कार करण्यात आला. 

 

 

यावेळी राहाता कृषी उत्पन्न बाजार समिती चे सभापती ज्ञानेश्वर गोंदकर, पंचायत समिती चे माजी उपसभापती दिपक तुरकणे, माजी उपनगराध्यक्ष अभय शेळके,  महेंद्र शेळके, सुजित गोंदकर, तुषार गोंदकर,नितिन गोंदकर, अँड.विलास आसणे,प्रमोद गोंदकर, संदीप गाढवे,  शंकरराव शेरकर,भिमाशंकर लोखंडे, अर्चना शेखर गाढवे, रामनाथ तुरकणे,विक्रम तुरकणे, जालिंदर तुरकणे,सतिश तुरकणे, दिनेश तुरकणे, रमेश सालपूरे, रविंद्र सालपूरे, दिगंबर सालपूरे, रविंद्र तुरकणे, पप्पू सालपूरे, बाळासाहेब बाभूळके आदी मान्यवर उपस्थित होते. 

 

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *