आश्वी l झुंजार न्यूज

संगमनेर तालुक्यातील पिंप्रीलौकी अजमपूर येथील  विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लिमिटेड,  या संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा सोमवार दि.१६।९।२०२४ रोजी सकाळी ९.३० वा. गणपती मंदिरामध्ये संस्थेचे चेअरमन मा. सिताराम बाबासाहेब दातीर यांचे अध्यक्षतेखाली होणार असल्याची माहिती सचिव अशोक लक्ष्मण दातीर यांनी दिली .
) मा. नियोजित अध्यक्षसाहेब यांना अध्यक्षस्थान स्विकारण्यास विनंती करणे.
२) दिवंगत सभासद, थोर नेत्यांना व जवानांना श्रध्दांजली अर्पण करणेबाबत.
३) मागील अधिमंडळ वार्षिक सर्वसाधारण सभेचे प्रोसिडींग वाचून मंजूर करणेबाबत.
४) सन २०२३-२०२४ सालातील अहवाल हिशोबाची १ ते ४ पत्रके वाचून कायम करणे बाबत.
५) सन २०२३-२०२४ ऑडिट मेमो वाचुन मंजूर करणे (१।४।२२ ते ३१ ।३।२३) सालाचे दोष दुरूस्ती वाचून नोंद घेणे
६) सन २०२४ ते २०२५ सालाकरिता संस्थेस लागणारे क.म. पत्रके तयार करून बँकेकडे मंजुरीस पाठविण्याचा अधिकार पंचकमेटीस देणेबाबत.
७) खरेदी विक्री करण्यात येणाऱ्या मालाचा दर ठरविण्याचा अधिकार पंच कमेटीस देणेबाबत.
८) थकबाकीदार सभासदाचे कर्ज वसुलीबाबत विचार विनिमय करणे.
९) सन २०२३-२०२४ सालाचे अंदाजपत्रकापेक्षा जादा झालेल्या खर्चास मंजुरी दणे. सन २०२४-२०२५ सालाचे अंदजपत्रकास मंजुरी देणेबाबत.
१०) संचालक मंडळाचे कर्जाचे विवरणपत्रक नमुद करणे.
११) सन २०२४-२०२५ संचालक मंडळाने ठरविलेल्या ऑडीटरला नेमणुक करणे बाबत मंजुरी मिळणे बाबत.
१२) संचालक मंडळाने ठरविलेल्या नफा वाटणीस मंजुरी देणे.
१३) संस्थेचे सभासद, संचालक मंडळ व कर्मचारी यांना सहकार प्रशिक्षण देणे बाबत. १४४ मा. अध्यक्षसाहेव यांचे पूर्व परवानगीने ऐनवेळी येणाऱ्या विषयांचा विचार करणे
तरी होणाऱ्या वार्षिक सर्व साधारण सभेस सर्व सभासदांनी मोठया संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन व्हा.चेअरमन बाजीराव गंगाधर गिते , संचालक बापु कारभारी दातीर , लक्ष्मण गुजाबा दातीर , बापु सखाराम लावरे , आण्णासाहेब पांडु गिते ,बाळासाहेब रंगनाथ बिडवे , हरीभाऊ शंकर दातीर ,  गोरक उमाजी गिते ,  कै. मधुकर कारभारी गिते , संपत देवजी कदम , सौ. मिमबाई सोपान गिते, सौ. नंदाबाई सोपान दातीर , सचिव अशोक लक्ष्मण दातीर , सेल्समन बाळासाहेब सखाराम दातीर , क्लार्क अनिल ताजणे ,  सचिन काशिनाथ दातीर (मालडेपो सेल्समन) यांनी केले आहे .
राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *