आश्वी l झुंजार न्यूज
पाथरे बु॥ येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येथे चालू शैक्षणिक वर्षांमधील दुसऱ्या माता पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विद्यार्थी माता पालक संघाच्या सौ सुवर्णाताई कडू हे होते .

या मेळाव्यासाठी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष आबासाहेब पा घोलप , प्राचार्य बारगुजे , उपमुख्यध्यापिका श्रीमती वाणी व शिक्षक , विदयार्थी माता पालकांच्या मोठ्या संख्येने उपस्थित होते .

यावेळी विद्यालयाचे प्राचार्य बारगुजे यांनी या शैक्षणिक वर्षांमध्ये शाळेमधील होत असलेले विविध उपक्रमांची माहिती देताना विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा आढावा घेतला. इयत्ता पाचवी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षा, विविध स्पर्धा परीक्षांची माहिती देत पालकांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण गुणवत्ता वाढीसाठी शिक्षकांबरोबर संपर्क ठेवावा. तर मोबाईल टीव्ही या बाबीवर जास्तीचा वेळ न देता विद्यार्थ्यांच्या प्रगतीस अडथळा निर्माण होणाऱ्या साधनांचा वापर कमी करावा या साधनांचा वापर केवळ काही वेळेकरिता मनोरंजन म्हणून व्हायला हवा . आपले विद्यार्थी जास्त वेळ यामध्ये गुंतून राहणार नाहीत याची काळजी घेणे गरजेचे आहे . तर सौ नळे यांनी सुसंस्कृत पिढी घडवण्यासाठी माता पालकांची जबाबदारी मोठी आहे शिक्षक हे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी सातत्याने विविध उपक्रम राबवितात. तर शाळेच्या विविध उपक्रमामध्ये पालकांचे नेहमी सहकार्य लाभते .

पालक प्रतिनिधी म्हणून प्रा. संजय कडू ,विद्यार्थिनींनी ही आपली मनोगते व्यक्त केले. प्रास्ताविक विद्यालयाच्या उपमुख्याध्यापिका श्रीमती वाणी यांनी केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती घोलप यांनी तर आभार प्रदर्शन सौ .अंत्रे यांनी केले .

