{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{"addons":1},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":true,"containsFTESticker":false}

 

राहाता । झुंजार न्यूज

 

 

 

जिल्ह्यामध्ये सर्वाधिक असा ३ हजार २०० रुपयांचा भाव ऊस उत्पादक शेतकऱ्यांना पद्मश्री विखे पाटील साखर कारखान्याने जाहीर के ला असून सभासदांबरोबरच कारखान्याच्या कामगारांना दिवाळीसाठी २० टक्के बोनस आणि आठ टक्के लाभांश देण्यात येणार आहे, अशी माहिती डॉ. सुजय विखे यांनी दिली.

 

 

 

पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्यातील नोकर लोकांच्या पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेचे अध्यक्ष प्रमोद राहाणे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या सभेस कारखान्याचे अध्यक्ष कैलास तांबे, प्रवरा बँकेचे अध्यक्ष डॉ. भास्करराव खर्डे, सतीश ससाणे, संचालक स्वप्नील निबे, संजय आहेर, कामगार नेते ज्ञानदेव आहेर, राजेंद्र म्हसे, कारखान्याचे कार्यकारी संचालक महेश कोनापुरे, प्रवरा बँकेचे कार्यकारी संचालक सौरभ बालोटे आदी याप्रसंगी उपस्थित होते.

 

आपल्या भाषणात डॉ. सुजय विखे म्हणाले की, अनेक वर्षांची सहकाराची परंपरा आपण सर्वांनी मिळून जपली आणि यशस्वीपणे पुढे घेऊन जाण्यात मोठी भूमिका बजावली आहे.

 

 

 

अनेक वेळा संकटं आली, पण या सर्वांचा सामूहिकपणे मुकाबला करून, सहकारी संस्था टिकवून ठेवण्यात यश मिळविले. यामध्ये सर्व कामगार बांधवांचा मोठा वाटा राहिला. थोड्याशा अपयशाने आपण कधी खचलो नाही. उमेदीने उभे राहत एक कुटुंब म्हणून आपण प्रत्येकाने बजावलेली भूमिका खूप महत्त्वपूर्ण ठरल्याचे त्यांनी सांगितले. यंदाच्या वर्षी कामगारांना २० टक्के दिवाळी बोनस देण्याची घोषणा करून कामगारांची सर्व देणीही लवकरात लवकर देण्याची ग्वाही त्यांनी दिली.

 

 

 

 

मंत्री राधाकृष्ण विखे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रवरा परिवारातील सर्वच संस्थांचे काम यशस्वीपणे सुरू असून, जिल्ह्यामध्ये सर्वाधिक असा ३ हजार २०० रुपयांचा भाव ऊस उत्पादक शेतकऱ्यांना जाहीर केला आहे. कामगारांचे पगारही वेळेत केल्यामुळे जिल्ह्यात डॉ. विखे पाटील साखर कारखाना प्रथम क्रमांकावर असल्याचे त्यांनी आवर्जुन सांगितले. यासभेस संस्थेचे सर्व संचालक, सभासद उपस्थित होते.

 

सभेचे प्रास्ताविक अध्यक्ष प्रमोद राहाणे यांनी केले .

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *