{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{"addons":1},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":true,"containsFTESticker":false}

संगमनेर l झुंजार न्यूज 

महाराष्ट्राच्या राजकारणात युवा नेत्यांची संख्या फार कमी आहे. राज्यात आजच्या घडीला चार – पाच युवा नेत्यांची नावे समोर येतात. त्यापैकीच आमदार सत्यजीत तांबे यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. महाराष्ट्रात युवकांचा नेता म्हणून म्हणून त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. माझ्यासारख्या असंख्य युवकांच्या पाठीमागे वारंवार उभा राहून त्यांना पाठबळ देण्याचं काम सत्यजीत दादा नेहमी करत आले आहे.

सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत, त्यामध्ये स्वतःच हित बघणारे जास्त तर सामान्य माणसाचे हित बघणारे कमी नेते राहिले आहेत. सत्यजीत दादा हे नेहमीच सामान्य व्यक्तीचा आवाज झाले आहे. अगदी सभागृहात देखील त्यांनी अनेक प्रश्न उपस्थित करून सामान्य माणसाला न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. याच उदाहरण द्यायचे झाले तर, नुकत्याच झालेल्या पावसाळी अधिवेशनात सत्यजीत दादांनी महात्मा फुले जन आरोग्य योजनेत डेंटल उपचारांचा समावेश करण्यात यावा अशी मागणी केली. त्यांची ही मागणी तत्काळ मान्य करत आरोग्य मंत्र्यांनी डेंटल उपचारांचा समावेश महात्मा फुले जन आरोग्य योजनेत केला. त्यांच्या या मागणी मुळे राज्यातील लाखो नागरीकांना फायदा झाला आहे.
2023 ची नाशिक पदवीधर मतदार संघाची निवडणूक अतिशय रंगमंचक झाली, वेळेला पक्षानेही त्यांची साथ सोडली. पण हार न मानता त्यांनी विजय मिळवला. निवडणुकीत जिंकून आल्यापासून लगेच त्यांनी कामाचा सपाटा सुरू केला. मतदारांचे आभार मांडण्यासाठी त्यांनी आभार दौरा देखील केला. आभार दौऱ्या दरम्यान त्यांनी नागरिकांचे प्रश्न जाणून घेत ते सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न देखील केला.
ते म्हणतात ना., विद्या विसरावी, चाक रुतावं! कवचकुंडले काढून घ्यावी, तरीही हिमतीने रणांगणावर ठाम पणे उभ रहावं.! हाच खरा पराक्रम! ही बाब तंतोतंत सत्यजीत दादांच्या बाबतीत लागू होते. प्रामाणिकपणे काम करून देखील आपल्याला डावलण्यात आल हे विसरून जिद्दीने आणि ताकदीने ते समोर उभ्या असलेल्या आवाहनाला सामोरे गेले. याच दरम्यान मला एक गोष्ट  अनुभवायला मिळाली ती म्हणजे, आपले प्रश्न सोडवणारं हक्काचे व्यासपीठ मिळणार या भावनेने संपूर्ण महाराष्ट्रातील असंख्य युवक परिवार पक्ष बाजूला ठेवून सत्यजीत दादांच्या पाठीमागे ठामपणे उभा राहिला. आणि निवडणुकीच्या रणधुमाळीत दादांची साथ देऊन दादांना प्रचंड बहुमताने निवडून आणले.
जिंकल्यानंतर अनेक नेते प्रचाराच्या रणधुमाळीतून आराम करण्यासाठी विदेशात जातात. परंतु सत्यजीत दादांनी पायाला भिंगरी लावून मागील दीड वर्षात किमान 01 लाख किलोमीटर पेक्षा जास्त प्रवास करून नागरिकांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न केला. पाच जिल्हे 54 तालुके असलेल्या मतदार संघाचे दादा सतत दौरा आजतागयात करत आहेत.
भाषण कौशल्य, वकृत्वाची ठाम भूमिका, प्रामाणिक विश्वास या जोरावर आजही सत्यजीत दादा मतदार संघातील तसेच मतदार संघा बाहेरील सामान्य माणसाचे प्रश्न सोडवतांना वेळोवेळी पहायला मिळतात.
आपले काम व्यवस्थित आहे की नाही हे तपासण्यासाठी त्यांनी मतदार संघात सर्व्हे सुरू केला, आपल्या कामाचा सर्व्हे करणारे ते राज्यातील पहिलेच आमदार ठरले. आपले कार्य जाणून घेण्यासाठी सत्यजीत दादांनी जनतेतून आपल्या कामकाजाचा प्रत्येकी 100 दिवसांचा सर्व्हे सुरू केला. व त्याचा अहवाल देखील जनतेसमोर मांडला. आपल्या संपूर्ण कामकाजाचा लेखाजोखा मांडणारा एक सच्चा नेता मी खऱ्या अर्थाने यावेळी जवळून अनुभवला. यावेळी खऱ्या अर्थाने आपल्या सर्व कामांची अंमलबजावणी कशी असावी याची प्रचिती दादांच्या संपूर्ण मित्र परिवाराला आली. सत्यजीत दादांच्या याच कार्यशैलीमुळे  राजकारणापलीकडे त्यांना मानणारा मोठा वर्ग तयार झालेला पाहायला मिळतो. जो की मी दादांसोबत काम करताना अनुभवत आहे.
“वारसाने संधी मिळते परंतु, कर्तुत्व हे सिद्ध करावंच लागतं” दादांचे हे ब्रीद वाक्य असंख्य युवकांच्या मनात कोरलं गेलंय.
वेळेचं नियोजन, उत्तम कौशल्य, सदैव आणि सतत संपर्कात असणाऱ्या माझ्या आयुष्यातील या अवलियाला म्हणजेच सत्यजीत दादा तांबे यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
लेखक आमदार सत्यजीत तांबे यांच्या मीडिया व सोशल मीडिया विभागाचे प्रमुख आहे.
राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed