{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{"addons":1},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":true,"containsFTESticker":false}

 

 

संगमनेर l झुंजार न्यूज

 

27 सप्टेंबर 1983 रोजी सत्यजीतचा जन्म झाला. लहानपणापासुन दिसायला गोंडस, दाट केस असलेला. गल्लीत सर्वांचा लाडका कुणीही यावं त्याला उचलुन घ्यावं. गल्लीतील छोटी मुले रोज त्यांच्याजवळ जमायचे अन् त्याला सोनु बाळ म्हणायचे. नाव काय ठेवायचे चर्चा चालूच होती. रोज नवीन नवीन नावे सुचायचे. एक दिवस माझे वडील ति. भाऊसाहेब थोरात (दादा) आले अन् म्हणाले सोनुबाळ नाही म्हणायचे. आजपासुन बाळाचे नाव “सत्यजित” आहे. आणि मग आम्ही सत्यजित म्हणु लागलो.

 

 

 

माझा दुसरा मुलगा डॉ. हर्षलचा जन्म झाला अन् बोबड्या बोलान तो मोठ्या भावाला “ददु” म्हणु लागला अन् मग मी पण लाडाने ददु म्हणु लागले. अर्थात सर्वांसमोर मी सत्यजित च म्हणते. डॉ. हर्षल मात्र त्याला दादा म्हणु लागला. पहिल्यापासुन अभ्यासात हुशार वर्गात नंबर येणारा, स्कॉलरशीप मिळविणारा सत्यजीत कॉलेजमध्ये असतांनी मित्रांमध्ये आवडता झाला. त्यातूनच N.S.U.I. ची काँग्रेसची सुरुवात केली.

 

 

माझे पती डॉ.सुधीर तांबे एम.एस. जनरल सर्जन असल्याने आम्ही एस्.टी. स्टॅन्ड शेजारी संगमनेर येथे हॉस्पिटल बांधले. व वरच्या मजल्यावर रहाण्याची सोय केली. डॉ. तांबेची प्रॅक्टिस खूप चांगली होती. एक उत्तम सर्जन म्हणून प्रसिध्द होते. त्यामुळे हॉस्पिटलला खूप गर्दी असे. दोन्हीही मुले येता – जाता पेशंटच्या संपर्कात येत. पेशंटचे नातेवाईक मुलांशी बोलत. त्यामुळे समाजात मिसळण्याचा स्वभाव झाला. पेशंट ग्रामीण भागातील असल्याने त्या काळात एवढे हॉटेल सुविधा नव्हत्या. कोणी उपाशी आहे समजलं कि मला न सांगता जेवण देऊन यायचे. कधी पेशंटला काही अडचण असली कि विचारायचे. कंपाउंडर वरच्या जिन्यात जेवायला बसले कि सत्यजीत लगेच त्यांच्यात जेवायला भिडायचा. ते अशा कृतीतून उत्तम संस्कारीत बनत होते हे आम्हाला समजलेच नाही. वाचनाची लहानपणापासुनच आवड आहे. स्वतः च्या नावाचा शिक्का बनवुन आणला व छोटी छोटी पुस्तके विकत आणली कि त्यावर शिक्का मारून ठेवायचा. त्याच्यामुळे हर्षललाही वाचनाची आवड लागली. आम्हा दोघांनाही वाचायला आवडते. घरांत नेहमी पुस्तके पडलेली असतात. डॉ. तांबेचे मित्र सुनिल बुब फोटो ग्राफर होते. त्यांना बोलावुन स्वतःचे स्टायलिश फोटो काढून घ्यायचा. नेहमी सॉक्स, शुज घालून असायचा.
सत्यजीत पाचवीत व हर्षल चौथीत असतांनी डॉ. तांबेनी व सवि, हर्षल, सत्यजित यांना कुलुमनाली ला एक ठाण्याच्या ट्रॅव्हल्स बरोबर ट्रेकिंगला पाठविले. त्यांच्या साठी गोष्टी सांगायला स्वतः लेखक राजा मंगळवेढेकर होते. एक सोबतीला तरुण डॉक्टर होती. नात्यातील सर्व मुले व इतर मुले, मुली होत्या, 15 दिवस ते गेले. ट्रीप ट्रेकिंग मध्ये सत्यजित ने जो कुणी आजारी पडेल त्याला गोळ्या देऊन बरे करायचा. ती तरुण डॉक्टर काहीच ट्रीटमेंट देऊ शकली नाही. सत्यजीत नेहमीच डॉ.तांबे बरोबर ओपीडीत आजू बाजुला असायचा, त्याला प्रिस्किशन वाचून औषधे माहीत असायचे. डॉ. नी सर्व प्रकारच्या गोळ्या बरोबर दिलेल्याच होत्या. त्याच्या उपजत हुशारीच्या खूप गोष्टी सांगता येतील. डॉ. तांबे त्यांच्यासाठी व बरोबरीच्या लहान- मुलांसाठी आठ दिवसाचे निवासी शिबीर घ्यायचे. त्यातून अक्षर, वक्तृत्व, व इतर गोष्टी शिकविल्या जायच्या. पण सत्यजीत व हर्षलचे अक्षर त्यातून इतके सुंदर झाले कि मराठी व इंग्रजी टाईप केल्यासारखेच आहे. सत्याजित लहानपणी 4थी, 5 वीत असतांनी वक्तृत्व स्पर्धेत भाग घ्यायचा. त्याचे भाषण स्वत:च तयार करायचा एकटाच एस. टी. ने जायचा. त्याचे व हर्षलचे सायकलिंग जोरात असायचे क्रिकेट व इतर खेळ खेळायचे. सायकलवर जाऊन मला दुकानातून पटकन सामान आणून द्यायचा. इंग्रजीवर दोघांचीही चांगली कमांड आहे.

 

 

डॉ. सुधीर तांबे आमच्या कुटुंबाचे “ हेडमास्टर ” होते. व आहेत. पण व आता आमच्या कुटुंबाचा सत्यजीत “ हेडमास्टर ” आहे. अंगणापासून तर रुमपर्यंत सर्व व्यवस्थित लागते. रोज सूचना करतो. थोडे अव्यवस्थित दिसले की रागवतो. स्वतःचे सर्व कामे तो स्वतः करतो. त्याला स्वयंशिस्त आहे. अगदी बॅग भरणे. कपडे धुण्यास देणे. वेळ मिळेल तेव्हा कपडे इस्त्री करणे. तो कुटुंबातील माणसांची, घरच्या मदतनिसची, पी.ए., ड्रायव्हर यांची काळजी घेतो. त्याला डॉग खूपच आवडतात. खूप मनापासून प्रेम करतो. कुठूनही आला कि ” होप अन् जॉय ” दोन डॉग आहेत त्यांच्याशी खेळतो. त्यांचे लसीकरण, जेवण, औषधे बघुन घेतो. स्वभावाने खूप मवाळ आहे. पण कामे झटपट झाली पाहिजे हा कटाक्ष असतो. कामांचा निपटारा खूप वेगान करतो.

 

 

निर्णय शक्ती, चांगली आहे. भारतभर, महाराष्ट्रभर, जगभर अनेक देशात त्याचे मित्र आहेत. महाराष्ट्रात तर युवक काँग्रेस व जयहिंद लोकचळवळ याच्या माध्यमांतून असंख्य मित्र परिवार जोडलाय. जीवाला जीव देणारे मित्र आहेत. बोलणे मुद्यांचे असते. बोलण्यात पान्हाळ लावीत नाही. प्रत्येकाला मुद्दांचे बोलायला सांगतो. मी जर बोलायला लागले तर म्हणतो मुद्याचे बोल. इंग्रजी पुस्तकाचे भाषांतर करून “सिटिझन विल” हे पुस्तक प्रकाशित केले आहे. कोरोनाच्या काळात त्याने शेतीवर लक्ष दिले व तेथील डोंगरावर “दंडकारण्य अभियानाचे” काम केले त्या डोंगराला माझे बंधू आमदार बाळासाहेब थोरात यांनी डॉक्टर सुधीर तांबे यांनी “हर्मन हिल्स” हे नाव दिले एखादं काम हाती घेतलंकि त्याचा पाठपुरावा करून पूर्णच करतो त्याच काळात कोविड पेशंटला बेड मिळवून देणे, औषधांची सोय करणे व इतर मदतीचे कामे दोघेही भावांनी खूपच केले. त्याचे व्यक्तिमत्व अष्टपैलू आहे.

 

 

डॉ. सुधीर तांबे यांनी 25 वर्षापूर्वी सुरू केलेली “जयहिंद लोकचळवळ” च्या माध्यमातून सामुदायिक विवाह होत त्याचाही विवाह 121 जोडप्यांमध्ये 2011 साली झाला. त्याची पत्नी डॉ. मैथिली तांबे ही सुध्दा खूप कामाचा उरक असणारी आहे. ड्रायव्हींग, स्वयंपाक, घरचे मॅनेजमेंट, स्कूल ऑफीस, सर्व सांभाळते. अहिल्या, सुर्याला उत्तम सांभाळते त्यामुळे सत्यजितला वेळ मिळू शकतो.
असा आमचा ददु आमचा “हेडमास्टर” आहे. त्याचा आज वाढदिवस आहे. त्याला वाढदिवस करायला आवडत नाही. यावर्षी महाराष्ट्रातील 2000 मित्रांसह तो छत्रपतीचे जन्मस्थान शिवनेरी किल्ल्यावर, स्वच्छता मोहीम व वृक्षारोपण करणार आहे.

 

ददु तुला खूप खूप शुभेच्छा. तुझ्या भावी आयुष्यात तुझ्या हातून समाजाचे खूप काम होवो, सेवा होवो हीच सदिच्छा

 

सौ दुर्गाताई तांबे 

माजी नगराध्यक्षा , संगमनेर नगर परिषद

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed