आश्वी l झुंजार न्यूज
संगमनेर तालुक्यातील पिंपरी लौकी अजमपुर या गावामध्ये दिवसाढवळ्या मारुती मंदिराचा घंटा तसेच श्रीकृष्ण मंदिराचा घंटा व दानपेटी फोडल्याची घटना ताजी असतानाच आज रविवार रोजी अकरा वाजता जुने दागिने देव देवता उजळून देण्याच्या बहण्याने आलेल्या अज्ञात व्यक्तींनी येथील भोंडे वस्ती वरील एका वृद्ध महिलेचा गैरफायदा घेऊन अंगावरील एक तोळ्याचे डोरले व कानातील झुंबर असा दीड तोळ्याचा सोन्या च्यादागिन्यांची चोरीकरून पळ काढल्यामुळे पिंपरी लौकी गावात ग्रामस्थ मध्ये मोठी घबराट पसरली आहे तरी संबंधित पोलीस खात्याने तातडीनेचौकशी करून ग्रामस्थांना दिलासा द्यावा अशी मागणी सरपंच सौ संगीता भारतराव गीते यांनी केली आहे

त्यांनी प्रसिद्धी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की गेल्या दोन-तीन दिवसांमध्ये सलग घडलेल्या घटनांमुळे ग्रामस्थांमध्ये मोठी घबराट निर्माण झाली आहे दोन दिवसापासून गावाच्या वरील भागामध्ये व खर शिंदेच्या डोंगराखाली गीते वस्तीवर रोज रात्री नऊ ते बारा या वेळेमध्ये आकाशामध्ये दोन-तीन ड्रोन फिरत असल्याचे येथील नागरिकांच्या निदर्शनास आले त्यांनी याबाबत गावातील प्रमुख कार्यकर्त्यांसह आश्वी पोलीस स्टेशनच्या संबंधित अधिकाऱ्यांना याबाबत माहिती दिली हे ड्रोन रोज रात्री फिरत असल्यामुळे ग्रामस्थांमध्ये उलट सुलट चर्चेला उदान आले आहे एकीकडे रात्रीच्या वेळेला बिबट्याची मोठी दहशत आहे हे बिबटे दिवसाढवळ्या शेतकऱ्यांच्या जनावर हल्ले करीत आहे शनिवार दुपारी येथील शेतकरी श्री शिवाजी दगडू गीते यांची एक वर्षाची कालवड दुपारी तीन वाजता रानामध्ये चढत असताना बिबट्यांनी हल्ला करून जिवंत मारली यापूर्वी एक आठवड्यापूर्वी मोठ्या बाबा देवस्थाना जवळील शिकारीचा मळा येथील शेतकरी नारायण दातीर यांच्या गोठ्यामध्ये रात्रीच्या वेळेला बिबट्याने उडी मारून एका गाईचा पाय न कमी केलं व एक वर्षाची कालवड जागेवर मारून टाकली ही घटना ताजी असतानाच एकीकडे बिबट्याची दहशत व दुसरीकडे सातत्याने होणाऱ्या चोऱ्या यामुळे या भागातील ग्रामस्थ मध्ये प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली आहे दुसरीकडे विजेचा लपंडाव मात्र थांबत नाही या भागात सलग आठ दिवस शेतीपंपाचा वीजपुरवठा हा रात्रीचा असतो त्या वेळेला शेतकऱ्यांना शेतीतील पिकांना पाणी देणे मोठे जिकरीचे काम होऊन बसले आहे .या सर्व घटनेमुळे शेतकरी वर्ग एकीकडे बिबट्याची दहशत व दुसरीकडे चोरांचा सुळसुळाट यामुळे पूर्णता शेतकरी ग्रासलेला आहे दिवसाढवळ्या होणाऱ्या बिबट्याच्या दर्शनाने कित्येक शेतकऱ्यांच्या महिला या जनावरांना चारा घेण्यासाठी दज होत नाही तरी संबंधित अधिकाऱ्यांनी वरील दोन्ही गोष्टीची सखोल चौकशी करून ग्रामस्थांना दिलासा द्यावा अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे .

अंभोरे , मालुंजे , डिग्रस या गावासह रविवारी रात्री साडे नऊच्या सुमारास ड्रोनच्या घिरट्या चालू असल्याने लोकांमध्ये मोठी भीतीचे वातावरण निर्माण झाले झाल्याने रणजितसिंह देशमुख यांच्या स्विय साहाय्याकांनी फोनवरुन संगमनेर पोलिसांना पाचारण करत या ड्रोनचा शोध लावून यांची चौकशी व्हावी म्हणून मागणी केली .

