संगमनेर l झुंजार न्यूज

2024च्या पुढील महिन्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चासत्र व नियोजन करिता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(आठवले) पक्षाची महत्त्वपूर्ण तालुका कार्यकर्ता बैठकीचे मंगळवार दि. 1 आक्टोबर 2024 रोजी दुपारी 12.30 वाजता ‘ पडतानी कॉम्प्लेक्स हॉल ‘ जोशी स्वीट होमच्या मागे येथे आयोजित करण्यात आल्याची माहिती तालुकाध्यक्ष आशिष शेळके यांनी दिली .
गेल्या ४ महिन्या पुर्वी लोकसभा निवडणुकी पार पडल्या . शिर्डी लोकसभा हा एस सी करिता राखीव असताना या मतदार संघातून राष्ट्रीय नेते ना. रामदास आठवले हे निवडणुकीकरिता इच्छूक असताना सुध्दा भाजपा मित्र पक्षांनी जाणुन – बुजुन हा मतदार संघ आठवले यांना दिला नाही त्यामुळे सर्व दलित समाज्यात नाराजी निर्माण होवून अस्त व्यस्त पणा निर्माण झाला त्याचं माध्यमातून भाजपा मित्र पक्षांना दलित समाज्याची नाराजी भोवली त्यातून युतीला नगर जिल्हयातील दोन्ही जागा गमवाव्या लागल्या . आता दोन दिवसावर विधानसभेच्या निवडणुका होणार असल्याने कार्यकर्त्यामधील आलेली मरगळ दूर करण्यासाठी व आता शाश्वत निवडणुकीचे राजकारण करण्यात करिता संगमनेर तालुक्यातील कार्यकर्त्यांना राजकिय कानमंत्र देण्याकरिता कार्यकर्ता बैठकीचे मंगळवार दि 1 आक्टोबर 2024 रोजी दुपारी साडे बारा वाजता संगमनेर शहरातील जोशी स्वीट होमच्या मागील बाजूस असणाऱ्या  पडतानी कॉम्प्लेक्स मध्ये आयोजन करण्यात आले आहे .
 तरी या बैठकीसाठी तालुक्यातील सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे.असे आवाहन तालुकाध्यक्ष आशिष शेळके, तालुका कार्याध्यक्ष विजुभाऊ खरात, शहराध्यक्ष कैलास कासार, युवक अध्यक्ष योगेश मंतोडे, मधुकर सोनवणे, बाळासाहेब कदम, जनार्दन साळवे, सुनील सोनवणे, अशोक सोनवणे, रवी रुपवते, रमेश भोसले, सागर शिंदे, संपत भोसले, सिद्धार्थ भोसले, भरत भोसले, गौतम वर्पे, नाना कदम, सिद्धार्थ खरात, शहा नावाज बेगमपुरे, रुपेश राऊत, योहान मिसाळ, प्रकाश वाघमारे,शरद जमदाडे, आत्माराम अडांगळे, विजय अडांगळे, दीपक खरात, दिनकर शिंदे, लक्ष्मण मेढे,  शरद तपासे गोविंद सोनवणे, अविनाश सोनवणे,दीपक अडांगळे, राजू वाघमारे, दीपक खरात, शशिकांत रोकडे, विकास गायकवाड, नाना जगताप, अनिकेत खरात आदींनी केले आहे .
राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed