आश्वी l झुंजार न्यूज
येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत श्रीरामपूर विधानसभा ही आरक्षित जागा मिळावी म्हणून रिपाई कार्यकर्ते सातत्याने प्रयत्न करत असून ही जागा प्रामुख्याने महायुतीनी सोडवावी गेल्या १५ वर्षाच्यापासून भाजपाचा रिपाई हा घटक पक्ष असताना सुध्दा लोकसभेला डावलले गेले त्यामुळे समाज्यात असंतोष निर्माण झाला त्यांचा परिणाम जिल्हयात o/२ असा झाला त्यांच पध्दतीने जर विधानससेला डावलल्यास त्यांचा परिणाम O/१२ असाचं होईल असा निर्वानीचा इशारा रिपाई प्रदेश उपाध्यक्ष विजयराव वाकचौरे यांनी कार्यकर्त्यांच्या बैठकीतून दिला .

यावेळी राहाता शहरात झालेल्या कार्यकर्ता बैठकीत वाकचौरे हे बोलत होते यावेळी जेष्ठ नेते बाळासाहेब गायकवाड , जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात , जिल्हा युवा अध्यक्ष पप्पू बनसोडे , जिल्हा उपाध्यक्ष रमेश शिरकांडे, तालुकाध्यक्ष धनजंय निकाळे , अकोले तालुकाध्यक्ष राजेंद्र गवांदे , राहाता ग्रा तालुकाध्यक्ष विशाल कोळगे , शिर्डी शहराध्यक्ष नानाभाऊ त्रिभूवन , गणेश साळवे आदीस मोठ्या संख्येने जुन्या व नव्या दमाचे कार्यकर्ते उपस्थित होते .

यावेळी वाकचौरे पुढे म्हणाले की , गेल्या अनेक वर्षांपासून रिपाईच्या कार्यकर्त्यांना मित्र पक्षांच्या पदाधिकाऱ्यांकडून सन्मान पुर्वक न्याय मिळत नसल्याने दलित समाज्यासह कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी उफाळून येताना दिसत आहे मात्र होणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये आरक्षित असणारी श्रीरामपूरची जागेसह राज्यात १२ जागा व महामंडळे महायुतीतून मिळावी ही दलित समाज्याची व रिपाई कार्यकर्त्याच्या भावना असून जर रिपाई पक्षाला लोकसभा निवडणुकीप्रमाणे विधानसभेत ठेंगा दाखविल्यास यांचे वेगळे परिणाम विधानसभा निवडणुकीमधून दिसेल . ” अभी नही तो फिर कभी नही ” आता रिपाई चुप बसणारी नसून आक्रमक भूमिका घेणार आहे . श्रीरामपूर विधानसभेच्या माध्यमातून रिपाईचा पहिला आमदार विधानसभेत जाणार अशी भावना समाज्याची असून महायुती लोकसभेत जागा न दिल्याने त्यांचा झाला ०/२ परिणाम हा ताजाचं आहे तेव्हा श्रीरामपूरची जागा न दिल्यास विधानसभा निवडणुकीत जिल्हयातून o/१२ चं होणार यांची भाजपा वरिष्ठांनी दखल घ्यावी .

यावेळी बाळासाहेब गायकवाड , सुरेंद्र थोरात , पप्पू बनसोडे यांनी सुध्दा आपली मते मांडली .

श्रीरामपूर विधानसभेच्या जागेसह राज्यात रिपाई पक्षाला १२ जागा व कार्यकर्त्याना सत्तेच्या प्रवाहात आणण्यासाठी महामंडळे देण्यात यावे याकरिता लवकरचं भाजपा प्रदेशाध्यक्षासह अहमदनगर जिल्हयाचे पालकमंत्री यांची भेट घेवू व पालकमंत्री ना . राधाकृष्ण विखे पाटील यांनी मनावर घेतल्यास श्रीरामपूरची जागा ही निश्चित रिपाईला मिळेल यात तिळमात्र शंका नाही .
विजयराव वाकचौरे ( रिपाई प्रदेश उपाध्यक्ष )

