{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{"addons":1},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":true,"containsFTESticker":false}

संगमनेर l झुंजार

श्रीरामपूर विधानसभेची जागा दयावी अन्यया वेगळा पर्याय शोधण्यात येईल असा एकमुखी सूर रिपब्लिकन कार्यकर्त्यामधून संगगमनेर येथे झालेल्या कार्यकर्ता बैठकीतून दिसून आला .
संगमनेर मध्ये रिपब्लिकन पक्षाची बैठक पार पाडली . बैठकीच्या अध्यक्षस्थानी तालुकाध्यक्ष आशिष शेळके हे होते . तर शहराध्यक्ष कैलास कासार , कार्याध्यक्ष विजुभाऊ खरात ,  युवक अध्यक्ष योगेश मन्तोडे , शानू बेगमपुरे ,  रुपेश राऊत ,  मधुकर सोनवणे , बाळासाहेब कदम , जनार्दन साळवे ,  सुनील सोनवणे ,  अशोक सोनवणे , रवी रुपवते ,  रमेश भोसले ,  सागर शिंदे ,  संपत भोसले ,  सिद्धार्थ भोसले ,  भरत भोसले ,  गौतम वर्पे ,  नाना कदम , सिद्धार्थ खरात ,  दिनेश शिंदे ,  विकास गायकवाड ,  नाना जगताप ,  अनिकेत खरात आदीसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते . 
यावेळी आशिष शेळके म्हणाले की , गेल्या अनेक वर्षापासून रिपब्लिकन पक्ष हा महायुतीचा घटक पक्ष असून ही कार्यकर्त्यांना अदयाप कुठल्याही प्रकारे सत्तेच्या प्रवाहात सामिल करुन घेतले नसल्याची खंत व्यक्त करत केवळ भाजपाच्याचं कार्यकर्त्यांना महामंडळे मिळतात ही जाणुन – बुजुन अवेहलना करण्याचे धोरण दिसत आहे . रिपाई कार्यकर्ता स्वाभीमानी झाला असून जोपर्यंत कार्यकर्त्यांला सत्तेच्या प्रवाहात घेत नाही तोपर्यंत भाजपा मित्र पक्षाच्या कुठल्याही कार्यक्रमात आम्ही सहभागी होणार नाही असा इशारा दिला . तर पक्षाच्या नविन कार्यकारणी निवडण्यापुर्वी सदस्य नोंदणी मोहीम तालुक्यात राबवून गाव तेथे शाखा तर वाडी – वस्ती तेथे कार्यकर्ता थोड्याचं दिवसात उभा राहणार असल्याचे सांगितले .
यावेळी संध्याच्या राजकिय भूमीवर कार्यकर्त्यांनी परखड भूमिका मांडल्या तर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार शहराध्यक्ष कैलास कासार यांनी मांडले .
राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *