{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{"addons":1},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":true,"containsFTESticker":false}

 

पानोडी | झुंजार न्यूज

 

दक्षिण नगर लोकसभा निवडणुकीत धर्म व जातीच्या नावाने राजकारण झाले आता मात्र विधानसभा निवडणुकीत धर्म व जातीच्या नावाने राजकारण खपवून घेतले जाणार नाही राजकारण जरुर करा मात्र निपक्षपाती व विकासात्मक दृष्टीने जातीच्या व धर्माच्या नावाने सर्वसामान्य माणसाला त्रास देवू नका सर्व समाज्याला बरोबर घेवून विखे कुटुबांनी पिढयानं पिढ्या काम केले मात्र हे जातीचं भूत कुठून आले तेचं कळले नाही आम्ही निपक्षपाती व विकासात्मक कामाला महत्व देणारे असून लोकांनी ही आपल्या सर्वांगीण कल्याणासाठी साथ दया अशी गर्जना माजी खासदार डॉ सुजय विखे पाटील यांनी केली .

 

 

 

 

संगमनेर तालुक्यातील पानोडी येथील महिला बचत गट , भंजनी मंडळाच्या साहित्य वाटप , वयोश्री४ कोटी १३ लाख विकास कामांचा शुभारंभ प्रसंगी डॉ सुजय विखे पाटील बोलत होते . यावेळी कार्यक्रमांच्या अध्यक्षस्थानी माजी उपसंरपच नानासाहेब शिंदे हे होते तर डिग्रस संरपच अशोक खेमनर , सुरेश नागरे , माजी उपसंरपच अशोक तळेकर , रावसाहेब घुगे , माजी पोलिस अधिकारी भाऊसाहेब चव्हाण , साहेबराव कदम , जीवन कदम , बाळासाहेब कदम ,नाना कदम , संजय जाधव , पांडूरंग सांगळे , अशोक सांगळे , रामभाऊ घुगे , नय्युम सय्यद आदीसह मोठ्या संख्येने महिला व ग्रामस्थ उपस्थित होते .

 

 

यावेळी डॉ सुजय विखे पाटील म्हणाले की , गेल्या अनेक वर्षानंतर पानोडी गावास भेट दिल्याने तो आनंद वेगळाचं आहे या गावांची निष्ठा व प्रेम हे मनाला भावनारी आहे तर शेजारी आमदाराला ३५ वर्ष मते दिली त्या माध्यमातून त्यांनी तुम्हाला काय दिली हा मनाला पडणारा मोठा प्रश्न असून लोकांच्या मनातील वेदना त्यांना कशा कळाल्या नाही . त्यांनी केवळ दबाव तंत्राचे राजकारण केले मात्र ना विखे पाटील यांनी गेल्या १० वर्षात विकासाच्या माध्यमातून मोठा कायापालट केला . 

 

 

 

 

जाती धर्माच्या नावाने विष कालवणाऱ्या आता धडा शिकविणार तर या परिसराला निळवंडेच्या पाण्यांनी नंदनवन बनविण्याचा आपला निर्धार असून फक्त मोलाची साथ दया मग बघा . . तर त्यांनी बनविणाऱ्या बचत गटांना व्यवसायाकरिता आपण साहित्य दिले यातचं खरा आनंद असून आता नवा आध्याय सुरु केला असून महिलेला आर्थिक सक्षम बनविणार तर आम्ही ६० हजार महिलांना देव दर्शन लाभ मिळवून दिला 

 

 

डॉ सुजय विखे पाटील 

 

oplus_2

 

 

लाडक्या बहिणीनी डॉ सुजय विखे पाटील यांच्या दोन्ही हातावर भरुभरुन लाख्या बांधल्याने डॉ विखे यांनी सुध्दा भरभरुन साहित्यरुपी ओंवाळणी लाडक्या बहिनींना दिल्या . 

 

 

 

 

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *