{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{"addons":1},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":true,"containsFTESticker":false}

 

बारामती l झुंजार न्यूज

 

आदरणीय शरदराव पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत इंदापूर येथे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षात जाहीर प्रवेश

 

 

यावेळी बारामती लोकसभा मतदारसंघातून सुप्रिया सुळे यांनी खासदार म्हणून चाैथ्यांदा दिल्लीला पाठवल्याबद्दल इंदापूर तालुक्यातील जनतेचे आभार मानले. तसेच स्व. शंकरराव पाटील यांना आदरांजाली अर्पण केली.

 

 

 

सुप्रिया सुळे म्हणाल्या की , हर्षवर्धनभाऊ पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केल्याबद्दल आनंद व्यक्त करुन त्यांच्यासोबत काम करायला मिळणे ही आनंदाची आणि समानाधाची गोष्ट असल्याचे आवर्जून सांगितले. तसेच इंदापूर तालुक्याच्या विकासात हर्षवर्धन पाटील यांचे मोठे योगदान आहे . तर आपण सर्वजण  महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी एकत्र आलो आहोत. त्यामुळे एकत्रितपणे वाटचाल करत हर्षवर्धन पाटील यांच्यासह प्रत्येक कार्यकर्त्यांचा मानसन्मान राखला जाईल अशी ग्वाही देण्यात आली 

 

 

 

यावेळी पक्ष आणि चिन्ह गेल्यानंतर केलेल्या संघर्षाच्या आठवणींना उजाळा दिला. त्याचबरोबर “तुतारी वाजवणारा माणूस” हे चिन्ह म्हणजे पांडुरंगाने दिलेला आशीर्वाद आहे, अशी भावना व्यक्त केली. कारण ही तुतारी महाराष्ट्रात होणाऱ्या बदलाची नांदी आहे असे आवर्जून सांगितले. यावेळी राज्य सरकारच्या चुकीचा धोरणांवर टिका करुन महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार आणि महिलांवरील अत्याचाराविरोधात लढा द्यायचा असल्याचे सांगितले. तसेच या विधानसभा निवडणूकीत इंदापूर तालुक्यातून तुतारीचा विजय निश्चित असल्याची ग्वाही पक्षातील वरिष्ठ नेत्यांना दिली.

 

 

याप्रसंगी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील, खासदार डॉ अमोल कोल्हे, खासदार धैर्यशील मोहिते पाटील, आमदार अशोक बापू पवार, नारायण पाटील, जगन्नाथ बापू शेवाळे, उत्तमराव जानकर, मधुकर भावे, भारती शेवाळे, विकास लवांडे, अकिंता पाटील ठाकरे, मुरलीधर निंबाळकर, तेजसिंह पाटील, महारुद्र पाटील, सागर मिसाळ, अशोक घोगरे, अमोल भिसे, अस्मा मुलाणी, अशोक घोगरे, छाया पडसळकर, शरदजी जामदार, कृष्णाजी यादव, देवराज यादव, लालासाहेब पवार, उद्यसिंह पाटील, मयुरसिंह पाटील, पराग जाधव, प्रदीप पाटील, शेखर पाटील, पांडुरंग शिंदे, ऋतुजा ताई, मायाताई यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते आदी उपस्थित होते.

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *