माजी महसूल मंत्री आ . बाळासाहेब थोरात , खासदार भाऊसाहेब वाकचौरे, विवेक कोल्हे, मा. आ. डॉ सुधीर तांबे, सौ प्रतिभाताई घोगरे यांची उपस्थिती
संगमनेर । झुंजार न्यूज

याबाबत अधिक माहिती देताना जोशी म्हणाले की, विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली अमृतवाहिनी बँकेने शेतकरी गोरगरीब व सामान्य माणसांच्या जीवनात आनंद निर्माण करण्यात मोलाचा वाटा उचलला आहे. बँकेने संगणकीकरण कामकाजासह ऑडिटचा कायम अ दर्जा राखला असून नव्याने राहता व निमोण येथे शाखा सुरू होणार आहेत तर तळेगाव येथील शाखा नव्या जागी स्थलांतरित होणार आहे.

राहता येथील शाखेचा शुभारंभ गुरुवार दिनांक 10 ऑक्टोबर 2024 रोजी दु.3 वा. कारले कॉम्प्लेक्स स्टेट बँकेसमोर जवळ होणार आहे. यावेळी कुंदन लॉन्स येथे भव्य सभा होणार आहे. या कार्यक्रमासाठी विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात, खासदार भाऊसाहेब वाकचौरे, मा. आ.डॉ. सुधीर तांबे, युवा नेते विवेक भैय्या कोल्हे, सौ प्रभावती ताई घोगरे, रावसाहेब म्हस्के, अरुण पा. कडू, एकनाथराव घोगरे, ॲड .नारायण कारले, डॉ. एकनाथराव गोंदकर ॲड माधवराव कानवडे, सुधीरराव लहारे ,विजयराव दंडवते,राजेंद्र पिपाडा ,बाबासाहेब कोते, शिवाजीराव लहारे, ॲड .सुरेंद्र खरडे ,धनंजय गाडेकर, रामचंद्र बोठे, यांच्या उपस्थित होणार आहेत तर सायंकाळी सहा वाजता तळेगाव येथे नूतनीकरण शाखेचा शुभारंभ 6 वा सय्यद बाबा मैदान ,तळेगाव दिघे येथे होणार आहे. यावेळी आमदार सत्यजित तांबे ,रणजितसिंह देशमुख ,सौ दुर्गाताई तांबे ,डॉ.जयश्रीताई थोरात, इंद्रजीत थोरात ,संपतराव गोडगे, प्रभाकरराव कांदळकर यांचे सह विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

तर शुक्रवार दिनांक 11 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 6 वा. निमोन येथे नवीन शाखेचा उद्घाटन समारंभ वरील मान्यवरांच्या उपस्थित होणार आहे.

