संगमनेर | झुंजार न्यूज
माजी मंत्री, आमदार बाळासाहेब थोरात यांचे सोशल मिडीया प्रमुख असलेले विशाल मच्छिंद्र काळे यांची नुकतीच महाराष्ट्र काँग्रेस सोशल मिडीयाच्या प्रदेश सरचिटणीस पदी निवड झाली आहे. विशाल काळे हे अनेक वर्षांपासून मा. महसूलमंत्री आमदार थोरात यांच्या यशोधन कार्यालयात सोशल मिडीयाचे समन्वयक म्हणून काम पाहत असून काँग्रेस पक्षाचा विचार तळागळापर्यंत पोहचविण्यासाठी सोशल माध्यमांद्वारे ते सातत्याने प्रयत्नशील असतात.

विशाल काळे हे सर्वसामान्य कुटूंबातील असून आपल्या गुणवत्तेच्या जोरावर त्यांनी खूप कमी काळात सोशल मिडीयात आपले वेगळे वलय निर्माण केले आहे. कामाची तत्परता, अचूकता, संघटन कौशल्य याच कामाची पोच पावती म्हणून त्यांना यापुर्वीही युवक काँग्रेसकडून सुपर ६० चा सन्मान मिळाला आहे. आणि आता त्यांची नुकतीच महाराष्ट्र काँग्रेस सोशल मिडीया प्रदेश सरचिटणीसपदी निवड झाली आहे.


