{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{"addons":1},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":true,"containsFTESticker":false}

पानोडी l झुंजार न्यूज

संगमनेर तालुक्यातील विकास हा आ . बाळासाहेब थोरात यांनी दूरदृष्टी ठेवून ठेवल्यानेचं शाश्वत विकास झाल्याने आर्थिक प्रगतीला गती आली ‘ लाडकी बहिणी ‘ योजनेतून आपल्या मिळणारे हे १५०० रुपये अंध अपंग , वयोवृध्द व दीन दुबळ्याच्या योजनेवर घाला घालून दिल्याने हे योग्य नसल्याचे कॉग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष डॉ जयश्रीताई थोरात यांनी सांगितले .
संगमनेर तालुक्यातील सुरु असलेल्या युवा संवाद यात्रा  ही पानोडी दाखल झाल्यानंतर झालेल्या सभेतून डॉ थोरात बोलत होत्या .
यावेळी गणपतराव सांगळे ,  मिलिंद कानवडे , अजय फटागंरे , विक्रमराजे थोरात , संरपच गणपत हजारे , बबनराव कराड , गोपाळराव थोरात , सूर्यभान थोरात , बाळू नागरे , बाळू तळेकर , संदिप कराड , आदीसह मोठया संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते .
डॉ जयश्री थोरात पुढे म्हणाले की , युवा संवाद यात्रा ही दहा दिवसात १४५ गावातून संपूर्ण तालुक्याचा अभ्यास होत आहे हा तालुका तीन मतदासंघाच्या मक्तेदारी उभा आहे याला डोंगर , दरी , पठार भाग , दुष्काळ , सपाट भौगोलिक परिस्थिती असून यात  वेगवेगळ्या धर्म जाती लोक आहेत . संगमनेर तालुका एक परिवार आहे स्वतंत्र चळवळीपासून तालुक्यातील लोक स्वाभिमानाने जगत आहे कोणाच्या वाटोळ्याबाबत विचार झाला नाही सर्वाना बरोबर घेवूनचं आ थोरात चालले . तेव्हा भविष्यातील  हक्काचा आमदार , सुसंस्कृत आमदार , काम करणारा आमदार हवाय की दडपशाही , खोटे नाटे केसेस करणारा आमदार हवाय . ही निर्णय घेण्याची वेळ आली आहे . घडयाळ नसले तरी वेळ समजते तर आपला कारखाना हा वडील तर दूध संघ आई असून विकासाला दुरदृष्टी ठेवली त्यामुळेचं ८वर्ष बंद पडलेला कारखाना सुरु करण्याचा आग्रह राहिला अडचणीतून सुध्दा गणेशचा अडीज लाख टन गाळप झाले . आता ८५ प्रमाणे ही निवडणुक सुध्दा युवकांनी हातात घेतली असून थोरातांना मानणाराचं शिर्डीचा आमदार असेल असे शेवटी सांगितले .
राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed