आश्वी l झुंजार न्यूज
फार पुर्वीपासून शेतीला पुरक म्हणून दूध व्यवसायाकडे बघितले जात आहे मात्र कालातंराने दूध व्यवसायात स्पर्धा निर्माण झाल्याने युवकांनी सुध्दा दूध व्यवसायाला प्राधान्य देत नोकऱ्यांच्या मागे न लागता तंत्रज्ञान युक्त पध्दतीने गोठे , चाराचे नियोजन करत दूध व्यवसायात क्रांती निर्माण केल्याचे प्रतिपादन संगमनेर तालुका दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह देशमुख यांनी केले .

संगमनेर तालुक्यातील निमोण येथील कानिफनाथ व हरिओम दूध शितकरण केंद्राचे उद्घाटन संगमनेर तालुका सह. दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह देशमुख यांचे शुभहस्ते तसेच व्हाईस चेअरमन राजेंद्र पा चकोर यांचे उपस्थितीत संपन्न झाले.

सदर कार्यक्रमास बी.आर चकोर , ॲड. ज्ञानेश्वर सागंळे , दुध संघाचे संचालक विलासराव कवडे , संतोष माडेंकर , विक्रमराजे थोरात , भारतशेठ मुगंसे , विष्णू ढोले , रविंद्र रोहम ,गोरख नवले , सजंय पोकळे , डॉ. प्रमोद पावसेसो , अनिल घुगे , साहेबराव मंडलीक , रामचंद्र बाबा मंडलीक , साहेबराव गडाख , कार्यकारी संचालक डॉ. खिलारी यांच्यासह गावातील दूध उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Post Views: 646

