{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{"addons":1},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":true,"containsFTESticker":false}

 

 

आश्वी l झुंजार न्यूज

 

 

 

श्री. गजानन महाराजांच्या आशिर्वादाने व परिसरातील शेतकरी, ऊसउत्पादक, कर्मचारी, वाहतूकदारांच्या सहयोगाने संस्थापक चेअरमन रविंद्र बिरोले सुविद्य पत्नी यांच्या हस्ते २०२४ – २५ च्या ८ व्या गळीत हंगामाचा मोठ्या उत्साहात शुभारंभ !

 

 

 

संगमनेर तालुक्यातील पठार भागाला वरदान ठरणाऱ्या कौठे -मलकापूर येथे श्री गजानन महाराज शुगर कारखान्याचा शुभारंभ करून अडी – अडचणीतून मार्ग काढत रविंद्र बिरोले यांनी मोठ्या धैर्याने कारखाना सुरु ठेवत ऊस उत्पादकांचा विश्वासहर्ता निर्माण केला . तर इतर कारखान्याशी कुठल्याही प्रकारे स्पर्धा न करता कारखाना उत्कृष्ट व उच्चांकी पध्दतीने सुरु ठेवत २०२४-२५ च्या ८ वा गळीत हगांम रवींद्र बिरोले व पत्नी सौ आश्विनीताई बिरोले यांच्यासह श्री व सौ मंदा बिरु कारंडे , श्री व सौ मथुराबाई सुखदेव कोळसे , श्री व सौ सुरेखा किरण मिंडे , श्री व सौ मंगल बाबाजी सागर , श्री व सौ शारदा अंबादास काळे यांच्या हस्ते बायलर प्रतिपादन व ऊस मोळी गव्हाणीत टाकून शुभारंभ केला .

 

 

 

याप्रसंगी संचालिका अश्विनीताई बिरोले, शंतनू बिरोले, नंदन बिरोले, ईशाताई बिरोले, ॲड रामदास शेजूळ , हरिभाऊ गिते, सुभाष कोळसे, केरुबापू मगर, एकनाथ नागरे, आण्णासाहेब वर्पे , व्यवस्थापक आण्णासाहेब शेंडे , जनरल मॅनेजर विजयकुमार खरात , चीफ इंजिनिअर भाऊसाहेब मंडलिक , बाळासाहेब खेमनर, तानाजी बागूल, दिलीप पोटे, कैलास डोंगरे, भास्कर गाडे, गुलाब भोसले, नवनाथ ठेंबरे , आण्णासाहेब गुरसळ , आप्पासाहेब टेकुंडे , नवनाथ खेमनर , योगेश खेमनर , सोपान वाळुंज , माधव थिटमे , गोरक्षनाथ उबाळे , रोहीदास रसाळ , केशव वर्पे , शिवाजी नरवडे , वैभव सागर , अभिषेक रननवरे , लोकेशकुमार निसेन ,ज्ञानदेव पाचपूते , रमेश गायकवाड , विरेंद्र गर्जे आदींसह ऊसउत्पादक, सभासद, वाहतूकदार कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

 

 

यावेळी रवींद्र बिरोले म्हणाले, संध्या ऊस उत्पादन कमी प्रमाणात असून तरी ही आपण आपला कारखाना ऊस गाळप उच्चांकी दिसणार आहे. ३० किलोमीटरच्या परिसरातील ऊस उत्पादकांकडून जास्त अपेक्षा असून हा कारखाना आपल्या हक्काचा आहे, असे समजून जास्तीत जास्त ऊस देण्याचे आवाहन केले .

 

 

 

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *