{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{"addons":1},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":true,"containsFTESticker":false}

शिर्डी l झुंजार न्यूज

संपूर्ण जिल्हयाचे लक्ष लागलेल्या शिर्डी विधानसभा मतदारसंघामधून महायुतीच्या भाजपाचे उमेदवार पालकमंत्री आणि राज्याचे महसूलमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील हे ८व्यांदा ६९,८२८ एवढ्या मोठ्या मताधिक्क्याने विजयी झाले आहेत.
विखे पाटील यांना १,४३,८४८ एवढी मते पडली तर विरोधी उमेदवार सौ. प्रभावती घोगरे यांना ७४,०२० एवढी मते पडली. आपल्या विजयाचे श्रेय आपण मतदार संघातील मतदारांना देतो. ८व्यांदा येथील जनतेने आपल्याला विजयी केले. आयुष्यातील सर्वात मोठे माझ्यावर ऋण आहे. हा विजय मी जनतेला समर्पित करतो.
या क्षणाला आपल्याला पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटील, मातोश्री स्व. सिंधुताई यांचीही आठवण येत असून आपल्या विजयासाठी डॉ. सुजय विखे यांनीही मोठी मेहनत घेतल्याचे विखे पाटील यांनी आपल्या प्रतिक्रियेत सांगितले.
मविआच्या बोलघेवड्या पुढाऱ्यांना जनाधार नाही, हे जनतेने मतपेटीतून शिक्कामोर्तब केला आहे. थोरात यांच्याबाबत विचारले असता खोटा नरेटीव्ह ते सेट करण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, त्यांच्याच दहशतीचे झाकण उडाले असून जिल्हयातील जनतेने महायुतीवर मोठया प्रमाणावर विश्वास दाखवल्याबद्दल ना. विखे यांनी यावेळी जिल्हयातील जनतेला धन्यवाद दिले आहे.
राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *